E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
क्रीडा
सेफर्ट, फिलिप्स आणि मिल्नेची दमदार कामगिरी
Samruddhi Dhayagude
02 Nov 2026
न्यूझीलंडचा सात गडी राखून विजय
हॅमिल्टन : टीम सेफर्ट आणि ग्लेन फिलिप्स यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने पाचव्या टी-२० क्रिकेट सामन्यात भारताचा सात गडी राखून पराभव केला. या विजयामुळे न्यूझीलंडने पाच सामन्यांची मालिका २-३ अशी संपवली. भारताने पहिले तीन सामने जिंकून यापूर्वीच मालिकेवर कब्जा केला होता. चार फलंदाज बाद करणारा अॅडम मिल्ने सामनावीर ठरला, तर ग्लेन फिलिप्सला मालिकावीराचा बहुमान मिळाला.
नाणेफेकीनंतर प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. संजू सॅमसन अवघ्या ४ धावा, तर अभिषेक शर्मा केवळ १ धाव करून माघारी परतला. यानंतर ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी भारतीय डावाला सावरले. ईशान किशनने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या ३२ चेंडूंत ६१ धावा ठोकल्या. त्याच्या या खेळीत ५ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. दुसरीकडे, श्रेयस अय्यरनेही आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन करत २३ चेंडूंत ५० धावांची शानदार खेळी केली. त्याने ३ चौकार आणि ४ षटकार लगावले. याशिवाय नमन धीरने २३ चेंडूंत ३३ धावा, तर नितीश कुमार रेड्डीने १७ चेंडूंत २२ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून अॅडम मिल्ने सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत अवघ्या १९ धावा देत ४ गडी बाद केले. ब्लेअर टिकनर आणि नॅथन स्मिथ यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. भारताने २० षटकात आठ गडी गमावून १९१ धावा केल्या.
१९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाने आक्रमक सुरुवात केली. टीम सेफर्ट आणि ग्लेन फिलिप्स यांनी भारतीय गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवत सामन्याचे चित्रच पालटले. टीम सेफर्टने अवघ्या ५० चेंडूंत ९३ धावांची तुफानी खेळी केली. तर ग्लेन फिलिप्सने ३८ चेंडूंत नाबाद ६५ धावा ठोकल्या. त्याने ८ चौकार आणि ३ षटकार लगावले. या फलंदाजांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने अवघ्या १८ षटकांत विजयाचे लक्ष्य गाठले.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड - १९५/३ (टिम सेफर्ट ९३, ग्लेन फिलिप्स नाबाद ६५), अर्शदीप सिंग १/४०, नितीष कुमार रेड्डी १/१९ विजयी विरुद्ध भारत - १९१/८ (इशान किशन ६१, श्रेयस अय्यर ५०, अॅडम मिल्ने ४/१९, नॅथम स्मिथ २/२८).
मालिकेतून खूप शिकायला मिळाले - अय्यर
न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका ३-२ अशी जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने संघाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. मात्र, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात आणखी सुधारणा करण्याची गरज असल्याचे त्याने सांगितले.
पहिले तीन सामने जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती; मात्र अखेरचे दोन सामने गमावले. परदेशातील वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर खेळण्याचा अनुभव संघासाठी शिकवण देणारा ठरल्याचे अय्यरने नमूद केले.
Related
Articles
संकट समुद्रात, परीक्षा जमिनीवर
08 Nov 2026
शेवगाव तालुक्यात ३५ गावांना २८ टँकरद्वारे पाणीपुरवठा
05 Nov 2026
अनुभवायला मिळावी सर्वस्पर्शी दिवाळी!
07 Nov 2026
म्हसवडच्या सिद्धनाथांचा मंगळवारपासून विवाह सोहळा
08 Nov 2026
भारत-श्रीलंका सामना विशाखापट्टणमला
07 Nov 2026
लक्ष्मीपूजन धडाक्यात सणाचा उत्साह शिगेला
09 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)