E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
संपादकीय
वाचक लिहितात
Samruddhi Dhayagude
02 Nov 2026
पावसाचे पाणी जमिनीत जिरवा
भूजल पातळीत कमालीची घट झाली आहे. वास्तविक राज्यातील भूजलाच्या संवर्धनाची निकड १९७२ सालापासूनच अधोरेखित केली गेली; परंतु भूपृष्ठावर पाणी साठवण्याच्या महाराष्ट्रातील सोईच्या जागा आता झपाट्याने कमी झाल्या आहेत. विहिरीच्या सर्वेक्षणानुसार ६६ टक्के विहिरीतील पाण्याची पातळी नामशेष पातळीवर घटली आहे. ’भूजल पातळी’ वाढवण्यासाठी ’पाझर तलाव’ तयार केले गेले. तसेच ’पाणी अडवा पाणी जिरवा’ अशी सरकारी मोहीम राबवली गेली; पण पाणी आपल्या खडकाळ जमिनीत पुरेसे जिरत नाही. परिणामतः अत्यंत वेगाने बाष्पीभवन होऊन किती तरी पाणी हवेत विरून जाते. आपला पाणीप्रश्न अधिकच बिकट झाला आहे. आपल्याकडील पाणीप्रश्न असा आहे, की पाणी उसळत घुसळत उंच सखल भागातून जे वाहते त्याची गती कमी करायला हवी आणि पाणी जमिनीत जिरण्याचा जो गुणधर्म नाही तो कसा निर्माण करता येईल याचा विचार प्रामुख्याने करायला हवा. पावसाच्या फक्त पाच ते सात टक्के पाणी ’भूजल’ म्हणून जमिनीत जिरते त्याचे प्रमाण वाढवले पाहिजे.
बाळकृष्ण शिंदे, पुणे
पाणी जपून वापरा
यंदा सार्या महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे. सरकारने ३५८ तालुक्यांपैकी ३०४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील एकूण ३०३३ धरण प्रकल्पात ७०.१८ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी हाच साठा ९०.५९ टक्के होता. अजून पुढील वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत हा साठा पुरविणे सरकारची व आपणा सर्वांची जबाबदारी आहे. विदर्भ मराठवाड्यात अधिक तूट आहे. पाण्याचा थेंब अन् थेंब वाचविला पाहिजे. पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक आहे. सध्या शहरात गाड्यांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. त्या गाड्या धुतल्या जातात. साहजिकच पाणी फारच प्रमाणात खर्च होते. त्या ऐवजी ओल्या फडक्याने त्या पुसून घ्याव्यात. भांडी धुताना नळाची सतत धार ठेवू नये. घरातील नळ जेव्हा पाहिजे तेव्हाच सोडावेत. दररोज अंगण पाण्याने धुऊ नये तसेच झाडांना पाणी घालताना जे पाणी धुण्याचे असते तेच घालावे. वॉशिंग मशीनचा वापर मर्यादित ठेवावा. सरकारने जलतरण तलावावर काही दिवस पाणी सोडू नये व ते काही दिवस बंद ठेवावेत.
शांताराम वाघ, पुणे
राज यांचे भाकीत
’पुढील काही महिन्यात देशात मोठी गडबड होणार, काही काळ देशाला कुणी पंतप्रधान नसेल. अचानक राज ठाकरे भविष्यवेत्ते कसे बनले? यांच्या पक्षाला महाराष्ट्रात सुद्धा स्थान नाही ते देशाचे भविष्य कसे ठरवितात? सध्या झुरळांनी देशात जो हैदोस घातला आहे तो त्यांना मान्य आहे की काय? बांगलादेश सारखा ’रेजीम चेंज’ त्यांनाही हवा आहे का? एकूणच सध्या सर्वच राजकीय पक्ष बॅकफूटवर गेले असून सीजेपीच्या निमित्ताने स्वतःच्या आशा आकांक्षा जाहीर करत आहेत. विरोधकांनी निवडणुकीचा धसका घेतल्याने देशात अस्थिरता आणून जनतेला भयभीत करण्याचा त्यांचा विचार आहे; पण भारतीय जनता मतपेटीतून योग्य तो निर्णय घेणार हे नक्की!
माया भाटकर, पुणे
हिंसक प्रकार वाढले
देशामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या कारणावरून असंतोष पेटला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन चालू आहे, तर काही ठिकाणी जाळपोळीचे प्रकार घडत आहेत. मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार सुरू झाला आहे. कॉक्रोच पार्टीच्या वतीने पेपरफुटीच्या विरुद्ध विद्यार्थ्यांनी आंदोलन चालू ठेवले आहे. अमेरिकेमध्ये आपल्या हिंदू मंदिरावर हल्ला करण्यात आला होता. त्या हल्लेखोराला पकडण्यात आले आहे; परंतु हिंदूंवर अमेरिकेबरोबर यापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये तसेच बांगलादेश, पाकिस्तान अशा अनेक देशांमध्ये आतापर्यंत अनेक हल्ले झाले आहेत. एकंदरीतच ही सगळी परिस्थिती पाहता आपल्या भारत देशाविरुद्ध मोठे षडयंत्र तर चालू नाही ना? असा प्रश्न भारतीय नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे.
विजय आकुर्डेकर, पुणे
फटाक्यावर नियंत्रण कोणाचे?
उच्च न्यायालयाच्या बंदी आदेशानंतरही सार्वजनिक ठिकाणी जनतेने फटाके उडविल्याने आवाजाचे प्रदूषण झाले. त्यामुळे यंत्रणांच्या नाकर्तेपणावर न्यायालयाचा संताप होणे स्वाभाविकच आहे. न्यायालयाने यावर्षी डीजे, ढोल- ताशांना तसेच सार्वजनिक ठिकाणी फटाके उडविण्याला बंदी घातली होती. तरीही जनतेकडून त्या नियमांची पायमल्ली करण्यात आली. तसेही जनता हल्ली कोणत्याही यंत्रणेला जुमानत नाही असेच चित्र दिसते. उपनगरात अनेक गल्ली बोळ आहेत. अशा ठिकाणी जनतेने फटाके उडवल्यास त्यावर यंत्रणा कसे व किती नियंत्रण ठेवणार? आवाजाचे अथवा वायुप्रदूषण व्हायला इतर अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. इथे कोणी कोणाला दोष देण्यात अर्थ नाही. प्रत्येक यंत्रणेने तसेच जनतेने आपली जबाबदारी ओळखून वागणे व कृती करणे अपेक्षित आहे.
गुरुनाथ मराठे, बोरिवली (पूर्व), मुंबई
Related
Articles
अनमोल आणि तन्वीची दुसर्या फेरीत धडक
05 Nov 2026
शेतकरी, महिलांकडून सक्तीने कर्जवसुली नको
05 Nov 2026
दिल्लीतील टेलिकॉम विभागाच्या नावाने डिजिटल अटकेचा बनाव
11 Nov 2026
लक्ष्मीपूजनानिमित्त फुल बाजार बहरला
07 Nov 2026
घरकाम करणार्या महिलांनी घेतली पाणी वाचवण्याची शपथ
05 Nov 2026
निवडणुकीत भारतीय वंशाच्या नागरिकांचा डंका
05 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)