ओलेशकी शहरातील नागरिकांचे रशिया आणि युक्रेनकडे स्थलांतर   

आजपर्यंत युद्धविराम; बेलारूसमार्गे प्रवास सुरू 

किव्ह : रशियासोबतच्या युद्धात ओलेशकी शहराला मोठी झळ बसली आहे. प्रचंड नुकसान होण्याबरोबर नागरिकांना संकटांचा सामना करावा लागला होता. या पार्श्‍वभूमीवर युद्धविराम जाहीर झाल्यानंतर तेथील नागरिकांनी शहर सोडले असून ते बेलारूस देशामार्गे युक्रेनच्या हद्दीत स्थलांतरित होत आहेत. साडेचार वर्षांपूर्वी रशियाने युक्रेनच्या खेरसान प्रांतात हल्‍ला केला होता. तेव्हापासून ओलेशकी शहर रशियाच्या ताब्यात आहे. आता नागरिकांनी हे शहर सोडून युक्रेनच्या भागात आश्रय घेण्यास प्रारंभ केला आहे. 
 
दरम्यान, तेथे मदतकार्य देखील राबविले जात आहे. नागरिकांना युक्रेनच्या हद्दीत पोहोचण्यासाठी निप्रो नदी ओलांडावी लागणार आहे. तसा बसने प्रवास करून इच्छित जागी पोहोचावे लागणार आहे. दरम्यान, खेरसान प्रांतात मंगळवारपासून युद्धविराम जाहीर केला होता. तो आज (रविवार) पर्यंत सुरू राहणार आहे. त्या दरम्यान, नागरिकांनी एक तर शहर सोडावे अथवा रशिया आणि युक्रेनकडून देण्यात येणारी मदत स्वीकारावी, अशी अटही घातली होती. तेथील दोन हजार नागरिकांना रशिया किंवा युक्रेनपैकी एक निवडण्याची संधी दिली आहे. 
 
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, ज्यांना यायचे आहे त्यांनी रशियाच्या अनपा शहरात दाखल व्हावे. प्रथम बेलारुसचे शहर होमेल येथे विमानाने यावे. त्यानंतर पुढील प्रवास रशियाच्या हद्दीकडे करावा. त्यांच्यासोबत युक्रेनचे मानवी हक्‍क आयोगाचे दिमित्रो लुबिनेट्स असतील. मदत कर्मचारी, वैद्यकीय पथकांनी होमेल यांची भेट घेतली. चार विमानातून नागरिक युक्रेनच्या हद्दीत दाखल झाले.

Related Articles