E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
शैक्षणिक
शिक्षक भरतीत मुलाखतीसाठी संस्थाचालकांकडे केवळ दहा गुण
Wrutuja pandharpure
01 Nov 2026
पवित्र पोर्टलवर 11,493 उमेदवारांची शिफारस; 3 ते 25 नोव्हेंबरदरम्यान मुलाखती
पुणे
: राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत संस्थाचालकांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी मुलाखतीसह निवड प्रक्रियेचे गुणांकन निश्चित करण्यात आले आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुण, संबंधित पदासाठीची व्यावसायिक आणि शैक्षणिक अर्हता यांना मिळून 90 गुण असतील. संस्थाचालकांच्या हातात मुलाखतीसाठी केवळ 10 गुण राहणार आहेत. त्यामुळे भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल, अशी माहिती शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात येणार्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 अंतर्गत मुलाखतीसह निवड प्रकारातील नियमित फेरीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे. खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील 10 हजार 328 रिक्त पदांसाठी 11 हजार 493 उमेदवारांची मुलाखत आणि अध्यापन कौशल्य चाचणीसाठी शिफारस करण्यात आली आहे. या उमेदवारांची एकूण 27 हजार 145 प्राधान्यक्रमांवर शिफारस झाली आहे.
शिफारस झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती आणि अध्यापन कौशल्य चाचणी 3 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश नियुक्ती प्राधिकार्यांना देण्यात आले आहेत. उमेदवार आणि संबंधित व्यवस्थापनांना एसएमएसद्वारे माहिती दिली जात असून, उमेदवारांना पवित्र पोर्टलवर लॉगिन करून निवडीची स्थिती पाहता येणार आहे. व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादीही पोर्टलच्या मुख्य पृष्ठावरील ‘डाउनलोड’ मेनूमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील शिक्षण सेवक व शिक्षक पदांच्या भरतीसाठी 27 मे ते 5 जून 2025 या कालावधीत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ऑनलाइन घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी दोन लाख 28 हजार 808 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन लाख 11 हजार 308 उमेदवार परीक्षेला प्रविष्ट झाले, तर एक लाख 70 हजार 108 उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण केली.
पवित्र पोर्टलवर 1 मे ते 20 जुलै 2026 या कालावधीत मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह अशा दोन्ही निवड प्रकारांसाठी शाळांच्या जाहिराती प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर पात्र उमेदवारांकडून 6 ते 16 ऑगस्टदरम्यान प्राधान्यक्रम मागविण्यात आले. मुलाखतीसह निवड प्रकारात एक लाख 31 हजार 505 उमेदवारांनी प्राधान्यक्रम निश्चित केले होते.यापूर्वी मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील पहिल्या टप्प्याच्या नियमित फेरीत 13 हजार 119 रिक्त पदांसाठी 27 ऑगस्ट रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या चार हजार 390 पदांसाठी रूपांतरित फेरीची गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात आली आहे.
तक्रारींसाठी 7 नोव्हेंबरपर्यंत मुदत
मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील निवडीसंदर्भातील तक्रारींच्या निवारणासाठी राज्यस्तरीय तक्रार निवारण व दुरुस्ती समिती स्थापन करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी विहित नमुन्यातील तक्रारी 7 नोव्हेंबर 2026 पर्यंत edupavitra2025grccgmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
Related
Articles
७३ लाख दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या खात्यात ५ हजाराची मदत जमा
05 Nov 2026
शिरपुंजेचा भैरवनाथ गड धार्मिक पर्यटनासह निसर्गप्रेमींचे आकर्षण
04 Nov 2026
अतिवृष्टी व पूरबाधित शेतकर्यांना २९१ कोटींची मदत
03 Nov 2026
वाचक लिहितात
03 Nov 2026
आंध्र प्रदेशाला ‘मुरासू’ चक्रीवादळाचा तडाखा
04 Nov 2026
वाचक लिहितात
07 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित