स्वदेशी दिशादर्शक उपग्रह झेपावला   

‘नाविक’ यंत्रणा उभी करण्याकडे इस्रोचे पाऊल

श्रीहरिकोटा : भारताची स्वदेशी दिशादर्शक प्रणाली ’नाविक’ अधिक मजबूत करण्याच्या दिशेने भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने एक यशस्वी पाऊल टाकले. त्या अंतर्गत जीएसएलव्ही एफ- 18 प्रक्षेपकाच्या साहाय्याने एनव्हीएस-03 या दुसर्‍या पिढीतील प्रगत दिशादर्शक उपग्रहाचे (नेव्हिगेशन सॅटेलाईट) यशस्वी प्रक्षेपण नुकतेच केले. या द्वारे गुगलच्या ग्लोबल पोझिशिनिंग सिस्टिम अर्थात जीपीएसला पर्यायी आणि स्वदेशी ’नाविक’ यंत्रणा उभी करण्याकडे झेप घेतली आहे. ’नाविक’ दिशादर्शक उपग्रह पृथ्वीवर तुमचे नेमके स्थान कोठे आहे ? हे अचूक सांगतो. ज्या प्रमाणे गुगलचे जीपीएस काम करते. त्याप्रमाणे ’नाविक’ ही स्वदेशी यंत्रणा काम करणार आहे. 
 
उपग्रहाचे प्रक्षेपण : आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून 30 ऑक्टोबरला रात्री 11:51 वाजता
उद्देश काय आहे : हा उपग्रह भारताची स्वदेशी दिशादर्शक प्रणाली ’नाविक’  अधिक मजबूत करण्यासाठी पाठवला आहे.
एल-1 बँड : यात पहिल्यांदाच एल 1  फ्रिक्वेन्सी सिग्नलचा समावेश केला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या स्मार्टफोनमधील मॅपिंग अ‍ॅप्स थेट भारतीय उपग्रहाशी जोडणे सोपे होईल.
स्वदेशी अणू घड्याळ (अ‍ॅटोमिक क्लॉक): अचूक वेळेसाठी स्वदेशी बनावटीचे अणू घड्याळ बसवण्यात आले आहे.
व्याप्‍ती आणि कार्य :  ’नाविक’ही प्रणाली भारताच्या मुख्य भूमीसह सीमेपासून 1 हजार 500 किलोमीटरच्या परिसरातील अचूक हालचालींवर आणि दिशादर्शनावर लक्ष ठेवेल.
 
’नाविक-3’ उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केल्याबद्दल शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे मी अभिनंदन करतो.  स्वदेशी ’नाविक’ दिशादर्शक यंत्रणा मजबूत करण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल अभिमानास्पद आहे. 
 - पंतप्रधान नरेंद्र मोदी 

Related Articles