E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
देश
उत्तर प्रदेशात एक कोटींवर हिंदू मतदारांची नावे गायब
Wrutuja pandharpure
01 Nov 2026
मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा दावा
लखनौ
: उत्तर प्रदेशातील मतदार याद्यांमधून 1.27 कोटी हिंदूंची नावे गायब झाली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. आता भाजप कार्यकर्त्यांना ’बूथ लेव्हल ऑफिसर’ साोबत समन्वय साधून, सर्व पात्र मतदारांचा समावेश मतदार यादीत होईल याची खात्री करण्यास सांगितले आहे. तसेच, या प्रक्रियेचा नियमित आढावा घेण्याचे निर्देशही दिले आहेत.
भाजपच्या राज्य कार्यकारी समितीची शुक्रवारी बैठक झाली. तेव्हा आदित्यनाथ यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदार याद्यांच्या ’विशेष तीव्र पडताळणी’ (एसआयआर) प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले. तसेच दावा केला की, मतदार याद्यांमधून कोट्यवधी हिंदूंची नावे गायब आहेत. सुमारे 1.27 कोटी हिंदूंची नावे वगळली गेली आहेत. त्यांनी सर्व पात्र मतदारांचा यादीत समावेश करावा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. नावे वगळल्यामुळे 28 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांत पक्षाची स्थिती कमकुवत होत आहे. लोकसंख्येच्या आकडेवारीचा संदर्भ देत आदित्यनाथ यांनी असा युक्तिवाद केला की, उत्तर प्रदेशात सध्या सुमारे 13 कोटी मतदारांच्या तुलनेत 16 कोटींहून अधिक मतदार असायला हवे आहेत. त्यांनी सांगितले की, 66 लाख जणांची नावे पंचायत मतदार याद्यांमध्ये आहेत, ती विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांमधून गायब झाली आहेत.
सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेणार्या 55 लाख नागरिकांची नावेही मतदार यादीतून वगळली गेल्याचा आरोप त्यांनी केला. त्याशिवाय 18-19 वयोगटातील सुमारे साडेचार लाख तरुणांची नावेही याद्यांमधून गायब आहेत, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, उत्तर प्रदेशच्या मतदार यादीतून 2.04 कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. ही नावे प्रामुख्याने शहरी भागातील असून, त्यात महिला मतदारांचे प्रमाण अधिक आहे. भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 84 लाखांहून अधिक नवीन मतदारांची भर पडली असून, आता एकूण मतदारांची संख्या 13 कोंटी 39 लाख 84 हजार 792 झाली आहे.मतदार यादीतून हिंदू मतदारांची नावे वगळल्या गेल्याचा मुद्दा आदित्यनाथ यांनी उपस्थित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना हिंदू मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली जातील, याची खात्री करण्याचे आवाहन केले होते.
Related
Articles
अमेरिका आणि पाकिस्तानमधून कॉक्रोच जनता पार्टीला निधी
06 Nov 2026
दिवाळी बचत बाजारात दोन दिवसांत 30 लाखांची उलाढाल
03 Nov 2026
अवैध उत्खनन प्रकरण
04 Nov 2026
दुष्काळाच्या सावटात माणुसकीचा हात
04 Nov 2026
तोतया निवडणूक निरीक्षक जाळ्यात
03 Nov 2026
आंदोलनावरील निर्बंधांविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक
03 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित