E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
देश
बंगळुरूमधील हॉटेलच्या तलावात दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू
Wrutuja pandharpure
01 Nov 2026
विजेचा धक्का लागल्याचा संशय
बंगळुरु
: कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधील एका पंचतारांकित हॉटेलच्या तलावात दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एक विमान कंपनीचा कर्मचारी आहे. पोहताना विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय शनिवारी अधिकार्यांनी व्यक्त केला.जर्मनीच्या लुफ्थांसहा विमान कंपनीचे कर्मचारी अलेक्जांडर मॅक्समिलन थीस (वय 57), आयबीएमचे प्रकल्प व्यवस्थापक जुराज होर्वात (वय 45), अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. हालासुरू पंचतारांकित हॉटेलच्या तिसर्या मजल्यावरील पोहण्याच्या तलावात शुक्रवारी सायंकाळी घटना घडली. दुर्घटनेत अन्य दोन परदेशी नागरिक जखमी झाले आहेत. त्यामध्ये अमेरिकन नागरिक मैथ्यू डेसैंटिस (41) आणि हॉटेलच्या तलावात पोहणार्या नागरिकांना मदत करणारा राहुल तिवारी (28) यांचा समावेश आहे. दोघेही मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना वाचविताना जखमी झाले होते. जखमींना मणिपाल रुग्णालयात हलवले असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, जुराज होर्वात कुटुंबासह 30 ऑक्टोबरला दाखल झाले होते. तर थीस हे 20 ऑक्टोबरपासून हॉटेलमध्ये राहात होते,. पोलिस आयुक्त सीमंत कुमार सिंग यांनी घटनेचे वर्णन दुदैवी असे केले आहे. दोन परदेशी नागरिकांच्या मृत्यूचे दु:ख व्यक्त करताना ते म्हणाले, तलावात विजेचा प्रवाह पसरल्याने धक्का लागून त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. वैद्यकीय तंत्रज्ञ आणि तज्ज्ञांच्या अहवालानंतर दोघांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. मृत्युमुखी पडलेल्या एका व्यक्तीच्या पत्नीने तक्रार दिली आहे. भारतीय न्याय संहितेचे कलम 106 (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत.
Related
Articles
घरगुती फराळ यंदा महाग
05 Nov 2026
देवगड हापूसच्या एका पेटीला 41 हजारांचा दर
09 Nov 2026
एसटीच्या महिला प्रवाशांना स्मार्ट कार्डसाठी मुदतवाढ
07 Nov 2026
मॉलच्या झगमगाटात गावच्या बाजारपेठा हरवल्या
05 Nov 2026
शनिवारवाडा 38 हजार 233 पणत्यांच्या तेजाने उजळला
09 Nov 2026
एसआयआर प्रक्रियेबाबत विरोधकांकडून जाणीवपूर्वक संभ्रम; भाजपचा आरोप
06 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)