नवी दिल्ली : जम्मू अणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी पत्रकार निधी राजदान यांच्याशी विवाह केला आहे. शनिवारी विवाह केल्याची पोस्ट एक्सवर त्यांनी टाकली आहे. त्यात उमर अब्दुल्ला यांनी म्हटले, एका नवीन प्रवासाची सुरुवात झाली...सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी नवी दिल्लीत ’स्पेशल मॅरेज अॅक्ट’ (विशेष विवाह कायदा) अंतर्गत हा विवाह झाला. या प्रसंगी दोन्ही कुटुंबांतील सदस्य साक्षीदार म्हणून उपस्थित होते. दरम्यान, 56 वर्षीय उमर यांचा पहिला विवाह पायल यांच्यासोबत झाला होता. उभयतांमध्ये समझोता झाल्यानंतर जुलैमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विवाह संपुष्टात आला होता. निधी राजदान यांचाही हा दुसरा विवाह आहे. श्रीनगर आणि नवी दिल्लीत आयोजित विवाह सोहळ्यांना दोन्ही कुटुंबांतील सदस्य आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. त्यामध्ये उमर अब्दुल्ला यांचे वडील फारुख अब्दुल्ला आणि आई मॉली, त्यांच्या तीन बहिणी व इतर जवळचे नातेवाईक, तसेच निधी राजदान यांचे वडील आणि ज्येष्ठ पत्रकार एम. के. राजदान आणि आई सरला उपस्थित होत्या.
Fans
Followers