E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
देश
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना शक्ती स्थळावर काँग्रेसची आदरांजली
Wrutuja pandharpure
01 Nov 2026
नवी दिल्ली
: माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना काँग्रेस पक्षाने शनिवारी ’शक्ती स्थळ’ येथे आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि पक्षाचे इतर अनेक नेते सकाळी पुष्प अर्पण करण्यासाठी ’शक्ती स्थळ’ येथे पोहोचले होते.
तत्पूर्वी काँग्रेसने ’एक्स’ वर पोस्ट टाकली, त्यात भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, अदम्य साहस आणि इच्छाशक्तीचे प्रतीक असलेल्या श्रीमती इंदिरा गांधीजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन, असे म्हटले होते. तर दुसर्या एका पोस्टमध्ये म्हटले की, आम्ही त्यांचे धैर्य, खंबीर नेतृत्व आणि भारताची एकता, अखंडता व प्रगतीसाठी त्यांनी दिलेले आजीवन योगदान स्मरणात ठेवतो. ‘आयर्न लेडी ऑफ इंडिया’ म्हणून त्यांची ओळख होती.
1966 ते 1977 आणि त्यानंतर 1980 पासून 1984 मध्ये झालेल्या त्यांच्या हत्येपर्यंत, पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. एकता आणि अखंडतेप्रती असलेली त्यांची दृढ बांधिलकी हीच त्यांच्या राजकीय कारकीर्दीची मुख्य ओळख होती. त्यांच्या महत्त्वपूर्ण कामगिरींपैकी एक म्हणजे 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान त्यांनी देशाचे निर्णायक नेतृत्व केले. युद्धात पाकिस्तानचा दारुण पराभव करून बांगला देशाची निर्मिती झाली. यातून त्यांचीप्रबळ दूरदृष्टी आणि दृढनिश्चय असलेल्या नेत्या म्हणून ओळख झाली होती.
Related
Articles
जनतेचा कौल मान्य नसेल तर निवडणुका तरी कशाला घेता?
04 Nov 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार आशुतोष काळे विजयी
04 Nov 2026
निवडणुकीत भारतीय वंशाच्या नागरिकांचा डंका
05 Nov 2026
वाचक लिहितात
09 Nov 2026
युवा ऑलिम्पिकमध्ये धिनिधीचे दुसरे पदक
08 Nov 2026
जिल्हा बँकेवर विखे-थोरात-गडाखांचे निर्विवाद वर्चस्व; लंके, शिंदेंनीही दाखविली ताकद
04 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित