सरदार पटेल यांना आदरांजली   

एकतानगर : स्वातंत्र्यानंतर विविध संस्थाने खालसा करून भारत एकसंघ बनविणारे लोहपुरुष सरदार वल्‍लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आदरांजली वाहिली. एकतानगर येथील पटेल यांच्या एकात्मतेच्या भव्य पुतळ्याला त्यांच्यासह नेत्यांनी पुष्पांजली अर्पण केली. सरदार पटेल यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त एकतानगरमध्ये खास कार्यक्रम आयोजित केला होता. मोदी काल सकाळीच परिसरात आले होते. तेथे त्यांच्यासह अनेकांनी  पटेल यांना पुष्पांजली अर्पण केली. 31 ऑक्टोबर हा दिवस एकता दिवस म्हणून दरवर्षी देशभर साजरा केला जातो. त्या अंतर्गत कार्यक्रम आयोजित केला होता. राष्ट्रीय ऐक्यासाठी आणि देश निर्मितीसाठी सरदार पटेल यांनी केलेले कार्य मोठे आहे. अशा शब्दांत मोदी यांनी पटेल यांच्या कार्याचा गौरव केला. केवळ पटेल यांच्यामुळे देश बलशाली, समृद्ध आणि क्षमतेने युक्‍त झाल्याचे ते म्हणाले.  देशाच्या सेवेसाठी पटेल यांनी दिलेले बलिदान आणि त्यांची निष्ठा, विकसित आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी एक मोठी प्रेरणा ठरते, असेही ते म्हणाले.’अखंड भारता’चे शिल्पकार आणि देशाचे ’लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली मी वाहतो. पटेल यानी संपूर्ण आयुष्य एक शक्तिशाली, समृद्ध आणि सक्षम भारत घडवण्यासाठी समर्पित केले.
 -पंतप्रधान नरेंद्र मोदी

Related Articles