E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
महाराष्ट्र
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा सुरू
Wrutuja pandharpure
01 Nov 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फडकाविला धर्मध्वज
गोदाकाठी आदिवासींच्या हस्ते महाआरती
नाशिक
: नाशिक -त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याला शनिवारपासून प्रारंभ झाला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वज फडकवून सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्यासाठी गोदावरी घाटावर संत-महंत, धार्मिक प्रतिनिधी आणि हजारो भाविक उपस्थित होते. संध्याकाळी 6 हजार 500 आदिवासींनी दक्षिणेची गंगा असलेल्या गोदावरीची महाआरती केली. या महाआरतीचा विश्वविक्रम होण्याची शक्यताही वर्तविली आहे. गोदावरीच्या काठावरील रामकुंड येथे मुर्मू यांनी धर्मध्वज फडकविण्यासह धार्मिक अनुष्ठान केले. या वेळी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर येथे दुपारी 12 नंतर पारंपरिक ध्वज फडकवला. या वेळी शृंगेरी पीठाचे शंकराचार्य विधुशेखर भारती उपस्थित होते. दरम्यान, रामकुंड येथे पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी आणि सिंहस्थ समितीचे मुख्य विश्वस्त सतीश शुक्ला यांनी धार्मिक अनुष्ठान केले. सिंहस्थ कुंभमेळा महादरवाजा ग्राम परिक्रमा शुक्रवारी झाली. तपोवन मैदानावरून सुरू झालेली परिक्रमा रामतीर्थ पंचवटीपर्यंत आणि संत, महात्मे आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत रामकुंडापर्यंत परिक्रमाचा समारोप झाला होता. शनिवारपासून सुरू झालेला कुंभमेळा 21 महिने सुरू राहणार असून 24 जुलै 2028 मध्ये संपणार आहे. विशेष म्हणजे, कुंभमेळ्याच्या प्रारंभासोबतच रामकुंड येथील प्राचीन श्री गंगा गोदावरी मंदिर 11 वर्षांनंतर काल उघडण्यात आले.
अमृत स्नानाचे दिवस
पहिले ’अमृत स्नान’ पुढील वर्षी 2 ऑगस्ट रोजी, आषाढ सोमवती अमावस्येला होईल. दुसरे स्नान 31 ऑगस्ट रोजी श्रावण अमावस्येला, तर तिसरे स्नान 11 सप्टेंबर रोजी भाद्रपद शुद्ध एकादशीला होईल. 11 सप्टेंबरचे ’अमृत स्नान’ पारंपरिकरीत्या वैष्णव आखाड्यांद्वारे केले जाते, तर शैव आखाडे या विधीमध्ये एक दिवस उशिरा सहभागी होतात. सिंहस्थ कुंभ मेळ्याची सांगता त्र्यंबकेश्वर येथे 27 फेब्रुवारी 2028 रोजी, तर रामकुंड येथे 24 जुलै 2028 रोजी होईल.
Related
Articles
अवजड वाहने लोणंदमार्गे वळवली
05 Nov 2026
महान फुटबॉलपटू रोनाल्डो निवृत्त
06 Nov 2026
आली दिवाळी
09 Nov 2026
दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या बांधावर शिवसेनेची दिवाळी
06 Nov 2026
पॉवरलिफ्टिंगमध्ये भावना टोकेकर यांची ऐतिहासिक कामगिरी
09 Nov 2026
ऊस दर आंदोलन स्थगित ४,२०० रुपयांचा प्रस्ताव मान्य
07 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित