लातूरमध्ये कुरिअर कंपनीच्या वाहनात पार्सलचा स्फोट   

एक कामगार जखमी

लातूर : लातूर जिल्ह्यात शनिवारी एका कुरिअर कंपनीच्या वाहनात पार्सलचा स्फोट झाला. या दुर्घटनेत एक कर्मचारी जखमी झाला आहे. वाहनातून पार्सल उतरवण्याचे काम सुरू असताना सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. स्फोटाचा आवाज वाहनातून निघणारा धूर पाहून परिसरात घबराट पसरली होती, असे अधिकार्‍यांनी सांगितले. या दुर्घटनेत पार्सल उतरवण्याचे काम करणारा एक कर्मचारी गंभीररीत्या भाजला असून, त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाहनाचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले आहे. तसेच, सर्व शक्यता गृहीत धरुन तपास केला जात असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान, संबंधित पार्सल कोणी पाठवले होते, त्यामध्ये नेमके कोणते साहित्य होते आणि स्फोट कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Related Articles