E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
महाराष्ट्र
अंतराळ संशोधनात भारतीय शास्त्रज्ञांची झेप!
Wrutuja pandharpure
01 Nov 2026
खोडदच्या दुर्बिणीतून उलगडली 28 लाख प्रकाशवर्षांची महाकाय ’एस’ आकाराची दीर्घिका
बेल्हे
, (वार्ताहर) : अंतराळाच्या अथांग विश्वात दडलेली अनेक रहस्ये उलगडण्याच्या दिशेने भारतीय शास्त्रज्ञांनी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर-पुणे) तसेच राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र (एनसीआरए-टीआयएफआर) येथील संशोधकांनी तब्बल 28 लाख प्रकाशवर्षे विस्तार असलेल्या एका महाकाय ’एस’ आकाराच्या रेडिओ दीर्घिकेचा शोध लावला आहे.
या संशोधनामुळे कृष्णविवरांची कार्यपद्धती आणि दीर्घिकांच्या जन्मापासून पुनर्जन्मापर्यंतचा प्रवास समजून घेण्यासाठी खगोलशास्त्रज्ञांना नवी दिशा मिळाली आहे. या शोधाचे सर्वांत वैशिष्ट्य म्हणजे संबंधित दीर्घिकेमध्ये कृष्णविवरातून ऊर्जा बाहेर फेकणार्या जेट उत्सर्जनाचे तब्बल चार स्वतंत्र टप्पे आढळले आहेत. आतापर्यंत अशा प्रकारच्या दीर्घिकांमध्ये तीन सक्रिय टप्प्यांचे पुरावे आढळले होते. मात्र, चार वेगवेगळ्या टप्प्यांत जेट उत्सर्जन झाल्याचे पुरावे मिळाल्याने हा शोध खगोलशास्त्रीय अभ्यासाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.
कृष्णविवराच्या चार सक्रिय टप्प्यांचा उलगडा
ग023721.13-010528.5 असे या रेडिओ दीर्घिकेचे नाव आहे. तिची वळणदार ‘एस’ आकाराची रचना आणि विस्तार संशोधकांचे लक्ष वेधून घेत आहे. दीर्घिकेच्या केंद्रस्थानी असलेल्या महाकाय कृष्णविवरातून वेगवेगळ्या काळात चार वेळा ऊर्जेचे जेट बाहेर पडल्याचे निरीक्षणांतून स्पष्ट झाले आहे. या जेटमुळे निर्माण होणार्या रेडिओ लहरींचा अभ्यास करून कृष्णविवराच्या पूर्वीच्या क्रियाशीलतेचा इतिहास समजून घेता येतो.
या संशोधनाचा आणखी एक रंजक पैलू म्हणजे रेडिओ दीर्घिकेचा पुनर्जन्म. कृष्णविवरातून बाहेर पडणारे ऊर्जेचे जेट काही काळानंतर मंदावतात. त्यांची ऊर्जा कमी झाल्याने रेडिओ उत्सर्जनही हळूहळू घटते. मात्र, कृष्णविवर पुन्हा सक्रिय झाल्यानंतर नव्याने जेट बाहेर पडू लागतात आणि दीर्घिकेत पुन्हा ऊर्जा निर्माण होते. या प्रक्रियेची तुलना राखेतून पुन्हा जन्म घेणार्या ’फिनिक्स’ पक्ष्याशी केली जाते. त्यामुळे अशा दीर्घिकांना विश्वातील पुनर्जन्माची अनोखी उदाहरणे मानले जाते. नव्या संशोधनामुळे कृष्णविवर कधी सक्रिय होते, कधी शांत होते आणि पुन्हा कशा प्रकारे कार्यरत होते, याचा अभ्यास अधिक सखोल करता येणार आहे.
या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी जुन्नर तालुक्यातील खोडद येथे उभारण्यात आलेल्या जगप्रसिद्ध जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचा वापर करण्यात आला. याशिवाय अमेरिकेतील व्हेरी लार्ज अॅरे (VL) आणि दक्षिण आफ्रिकेतील मीरकॅट (MeerKT) या अत्याधुनिक रेडिओ दुर्बिणींच्या निरीक्षणांचाही संशोधनासाठी उपयोग करण्यात आला. वेगवेगळ्या रेडिओ वारंवारतांवरील माहिती एकत्र करून दीर्घिकेची रचना, जेटचे वय आणि त्यांची ऊर्जा यांचा अभ्यास करण्यात आला. या संशोधनात प्रा. पवन खाडेकर, प्रा.धरमवीर लाल, प्रा.रमणा आत्रेय यांच्यासह संशोधकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
Related
Articles
वगळलेल्या मतदारांना आयोगाकडून नवी संधी
07 Nov 2026
शहर शिवसेनेच्या दुष्काळग्रस्त सहाय्यता हेल्पलाइनची घोषणा
05 Nov 2026
स्टोन क्रशरमुळे मावळमधील नऊ गावांचे आरोग्य धोक्यात
04 Nov 2026
अल्काराझची रुडवर मात
09 Nov 2026
भगवंत मान यांच्या तोंडाला दारूचा वास यायचा : राहुल
05 Nov 2026
डॉ. नीलम गोर्हे यांनी घेतली पायल यांच्या माहेरच्या व्यक्तींची भेट
08 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित