भोर, (वार्ताहर) : चढावर ब्रेक निकामी झाल्यामुळे मोटार मागे घेताना ती घाटात 70 ते 80 फूट खोल खाली पडली. सुदैवाने यामध्ये कसलीही जीवितहानी झाली नाही. तिघेजण किरकोळ जखमी झाले. मात्र मोटारीचे मोठे नुकसान झाले. ही घटना राजगडच्या पाबे घाटात शनिवारी सकाळी घडली. हडपसर येथून तीनजण तोरणा किल्ला पाहण्यासाठी मोटारीमधून निघाले होते. दरम्यान घाटाच्या दुसर्या टप्प्यात मोटारीचे ब्रेक निकामी झाल्यामुळे मोटार मागे घेताना ती दरीत पडली. झाडांमध्ये ती अडकली. पाठीमागून आलेल्या नागरिकांनी स्थानिकांची मदत घेऊन प्रशासन व बचाव पथकाला माहिती दिली. बचाव पथक व स्थानिकांनी मोटारीमधील तिघांना सुखरूप बाहेर काढले. वेल्हे ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर औषधोपचार करून घरी सोडले. या अपघाताची राजगड पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही.
Fans
Followers