E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
महाराष्ट्र
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान
Wrutuja pandharpure
01 Nov 2026
माण, पाटण, फलटण, जावळीत चुरशीची लढत
सातारा
, (प्रतिनिधी) : जिल्हा मध्यवतीं सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज (रविवारी) जिल्ह्यातील अकरा तालुक्यांतील मतदान केंद्रांवर सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत मतदान प्रक्रिया होणार आहे. संचालक मंडळाच्या 21 जागांपैकी नऊ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित 12 जागांसाठी मतदान होणार आहे.
माण, पाटण, फलटण, जावळी तालुक्यांत चुरशीच्या लढती असून, यामध्ये ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदानासाठी सहकार विभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा बँकेच्या यावेळच्या निवडणुकीत 2019 मतदार असून, अकरा तालुक्यांतील 11 केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक तालुक्यात एक मतदान केंद्र आहे. बँकेच्या संचालकांच्या 21 जागांपैकी नऊ जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये सोसायटीच्या सातारा, खटाव, वाई तसेच महिला राखीवच्या दोन, कृषी उत्पादक व प्रक्रिया संस्था मतदारसंघ, नागरी बँक व पतसंस्था मतदारसंघ, गृहनिर्माण आणि दुग्ध संस्था मतदारसंघ यांचा समावेश आहे. उर्वरित 12 जागांमध्ये एक-दोन जागा वगळता उर्वरित सर्व जागांवर चुरशीची लढत होत आहे.
यामध्ये जावळीत ज्ञानदेव रांजणे विरुद्ध विठ्ठल गोळे, महाबळेश्वरमध्ये रूपाली राजपुरे विरुद्ध संजय मोरे, कराडला उदयसिंह पाटील विरुद्ध धनंजय पाटील,पाटणला सत्यजित पाटणकर विरुद्ध पालकमंत्री शंभूराज देसाई, कोरेगावात सुनील खत्री विरुद्ध सुनील माने, माणला ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे विरुद्ध शेखर गोरे आणि मनोजकुमार पोळ, खंडाळ्यात संजीव गाढवे विरुद्ध अजय भोसले व श्यामराव गाढवे, फलटणला संजीवराजे नाईक-निंबाळकर विरुद्ध समशेरसिंह नाईक-निंबाळकर, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्ग मतदारसंघातून दीपक चव्हाण विरुद्ध रवींद्र बडेकर, सुरेश गायकवाड, सत्यवान कांबळे, इतर मागास प्रवर्गात योगेश फडतरे विरुद्ध संदीप पाचांगणे, विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्ग मतदारसंघात सुनील वाघ विरुद्ध अर्जुन काळे, औद्योगिक, वीणकर आणि मजूर संस्था मतदारसंघातून चंद्रकांत जाधव विरुद्ध सुनील वाघ अशा लढती आहेत. यामध्ये सुनील वाघ यांनी चंद्रकांत जाधव यांना पाठिंबा दिलेला असल्याने त्यांची निवडणूक एकतर्फी आहे. उर्वरित मतदारसंघात चुरशीच्या लढती होत आहेत.
तालुकानिहाय मतदान केंद्र
सातारा : शासकीय तांत्रिक विद्यालय, शाहू जिल्हा क्रीडा संकुलासमोर
जावळी : जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, मेढा
महाबळेश्वर : सेठ गंगाधर माखरिया हायस्कूल, महाबळेश्वर
कराड : शिवाजी शिक्षण संस्थेची आदर्श प्राथमिक शाळा
पाटण : ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल, रामापूर
कोरेगाव : कांतिलाल वीरचंद भंडारी प्राथमिक विद्यालय, दिवाणी न्यायालयाशेजारी, कोरेगाव
वडूज (खटाव) : हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज, वडूज.
दहिवडी (माण) : महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेज, दहिवडी.
खंडाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
वाई : जनता शिक्षण संस्थेचे किसन वीर महाविद्यालय
फलटण : श्रीमंत राणीसाहेब लक्ष्मीदेवी मालोजीराव नाईक-निंबाळकर
नगरपरिषद शाळा क्रमांक आठ.
Related
Articles
गोकुळ ब्रँड ‘अमुल’च्या घशात घालण्याचा महायुतीचा कुटील डाव
06 Nov 2026
जायकवाडीच्या रब्बी व उन्हाळी आवर्तनाचे वेळापत्रक निश्चित; शेतकर्यांना दिलासा
06 Nov 2026
वर्ल्ड टूर फायनल्समध्ये स्थान मिळवण्याचा लक्ष्य सेनचा प्रयत्न
10 Nov 2026
सत्तेत बसून मोर्चे काढणार्या भाजप सरकारचा दुटप्पीपणा हास्यास्पद
06 Nov 2026
इराणवर अमेरिकेचे पुन्हा हल्ले
07 Nov 2026
रिंकू सिंहची उपकर्णधारपदी नियुक्ती
09 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)