E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
माणसांसह वन्यजीवांना बेघर करून विकास कशासाठी?
Wrutuja pandharpure
01 Nov 2026
संजय ऐलवाड
भाग ३
कर्जत
: जंगलातील झाडे असंख्य जीवांच्या जगण्याचा आधार आहेत. वृक्षतोडीमुळे जंगल उद्ध्वस्त झाले, तर पुन्हा जंगल उभे करणे शक्य नाही. मोठ्या वृक्षांची जागा लहान रोपांनी भरून निघणार नाही. त्यामुळे जंगलातील वन्यप्राण्यांच्या अधिवासाचा प्रश्न गंभीर होणार आहे. खोदकाम आणि यंत्रांच्या आवाजामुळे वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून स्थलांतर करावे लागेल. अनेक पक्षी आणि लहान-मोठे प्राणी बेघर होतील. त्यामुळे वन्यजीवांना बेघर करून वीज प्रकल्प कशासाठी? असा सवाल साईडोंगर परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
टोरेंट कंपनीच्या ऊर्जा प्रकल्पासाठी कर्जत तालुक्यातील साई डोंगर, आंबेवाडी आणि कोथलकलाटी या आदिवासी भागांत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील माणसांसह वन्यजीवांना बेघर होण्याची वेळ आली आहे. जंगल हे आमची जीवनवाहिनी असून, ते आम्ही नष्ट होऊ देणार नाही. जंगलाचे संवर्धन हे आमचे कर्तव्य आहे आणि ते आम्ही करणारच, असा निर्धारही या पाड्यावरील आदिवासींनी केला आहे.जंगल हे केवळ माणसांचे नसून वन्य जीवांचेही घर आहे. त्यांच्या अस्तित्वाचा विचार न करता विकासाच्या नावाखाली निसर्गाची हानी करू नका, असे आवाहन येथील ग्रामस्थ करत आहेत. कोथलकलाटी या परिसरात साग, करंज, चंदन, पळस, जांभूळ, फणस, उंबर, खैर, अंजन आणि आंबा अशा विविध वृक्षांची समृद्ध वनसंपदा आहे. विकासाच्या नावाखाली या झाडांची कत्तल करून कंपनी स्वार्थ साधत आहे.
या प्रकल्पामुळे वीज निर्मिती होईल आणि सुमारे 30 हजार जणांना रोजगार मिळेल, असा दावा केला जात आहे. मात्र, जंगलातील झाडे तोडल्यानंतर या परिसरातील जैवविविधतेचे काय होणार? याचे उत्तर कोणीच देत नाही. या प्रकल्पाच्या खोदकामामुळे सह्याद्रीच्या डोंगररांगांवर, जमिनीच्या स्थैर्यावर आणि परिसरातील पर्यावरणावर काय परिणाम होतील, याचा सखोल अभ्यास झाला आहे का? असा प्रश्नही ते उपस्थित करत आहेत. विकासाच्या नावाखाली जंगल, वन्यजीव आणि निसर्गाचा बळी दिला जाऊ नये, ही आमची स्पष्ट भूमिका असल्याचेही ते सांगत आहेत. आम्ही माणसे आहोत, प्रश्न मांडत आहोत; मात्र, या जंगलातील अबोल झाडे आणि वन्यजिवांचे प्रश्न कोण मांडणार? उलट मानवाने जंगलात हस्तक्षेप करून नुकसान केले आहे. तरी जंगलाने आजपर्यंत कोणतीही तक्रार केली नाही. जे जंगल आमचे आहे, आमचेच राहणार. यापुढे आम्ही कंपनी किंवा अन्य कोणालाही जंगलातील झाडांवर कुर्हाड चालवू देणार नसल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.
...तर पुढच्या पिढीला काय उत्तर देणार?
आमच्या पूर्वजांनी जंगलाचे रक्षण केले. त्यानंतर आम्ही हे जंगल जपले. ऊर्जा प्रकल्पासाठी हे जंगल नष्ट झाले तर आम्ही पुढच्या पिढीला काय उत्तर देणार? डोळ्यासमोर झाडांच्या कत्तली होताना आम्ही गप्प कसे बसणार? यापुढे कोणालाही आम्ही वृक्षतोड करू देणार नाही. झाडे तोडणार्यांना आम्ही आमच्या जंगलात पायही ठेवू देणार नसल्याचे या भागातील आदिवासी पाड्यावरील ग्रामस्थ सांगत आहेत.
वृक्षतोडीविरोधात तरुणांचे जल आंदोलन
कर्जत तालुक्यातील जंगलतोडीच्या विरोधात मुंबईतील बादल, अमन आणि सिद्धार्थ या तीन तरुणांनी मागील पाच दिवसांपासून पेज नदीत जल आंदोलन सुरू केले आहे. टोरेंट वीज निर्मिती प्रकल्पासाठी शेकडो वर्षे जुनी झाडे तोडली जात असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. हे तरुण वृक्षतोडीविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवीत आहेत. तसेच, स्वरचित व लोकगीतांच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन करत आहेत. जोपर्यंत प्रकल्प रद्द होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे या तरुणांनी सांगितले.
Related
Articles
महापालिकेच्या विरोधात खटले लढवणार्या पॅनेलवरील वकिलांना दिलेले मानधन वसूल करणार
06 Nov 2026
ऊसदराबाबत तिसर्या दिवशीही तोडगा नाही
06 Nov 2026
चिवड्यासाठी कढीपत्त्याला मागणी; दरातही वाढ
05 Nov 2026
पोलंड गोळीबारातील हल्लेखोराचा मृत्यू
09 Nov 2026
स्वच्छ विनोदाचा बादशहा
08 Nov 2026
झेंडू व शेवंतीने भाव खाल्ला : आवक घटली
09 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)