E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
सेट परीक्षेच्या तात्पुरत्या उत्तरतालिकेत गोंधळ
Wrutuja pandharpure
01 Nov 2026
पुणे
: राज्य पात्रता परीक्षा अर्थात एमएच-सेटच्या 25 ऑक्टोबर रोजी झालेल्या परीक्षेच्या तात्पुरत्या उत्तरतालिकेवरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने शनिवारी तात्पुरती उत्तरतालिका प्रसिद्ध केली. मात्र, अनेक उत्तरांमध्ये विसंगती असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. पेपर एक सह इतर विषयांच्या अनेक पेपर मधील प्रश्नांच्या उत्तरांबाबत आक्षेप नोंदविण्यात येत आहेत. त्यामुळे तात्पुरत्या उत्तरतालिकेच्या अचूकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र आणि गोवा मिळून एकूण 1 लाख 17 हजार 768 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 92 हजार 525 जणांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. राज्यातील 17 आणि गोव्यातील एका शहरासह एकूण 18 शहरांमधील 294 परीक्षा केंद्रांवर एकूण 32 विषयांसाठी परीक्षा झाली होती. तात्पुरत्या उत्तरतालिकेत चुकांमुळे व सेट विभागाच्या अकार्यक्षम कारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. परीक्षा ते निकाल जाहीर करणे या प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता आणि अचूकता अपेक्षित असते. मात्र, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याऐवजी विद्यार्थ्यांनाच त्याची किंमत मोजावी लागत असल्याचे चित्र आहे.तात्पुरत्या उत्तरतालिकेतील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे संभाव्य गुण बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे सेट विभागाने तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन पेपर संचाची तज्ज्ञ समितीमार्फत तपासणी करावी, चुकीची उत्तरे दुरुस्त करावीत आणि विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी आक्षेप शुल्काबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.
हटवलेली लिंक पुन्हा संकेतस्थळावर...
सेट विभागाने शनिवारी तात्पुरती उत्तरतालिका प्रसिद्ध केली होती. यामध्ये जवळपास प्रत्येक विषयाच्या बहुतांशी प्रश्नांची उत्तरे चुकीची दिली होती. ही बाब काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आली, त्यानंतर काही वेळातच संकेतस्थळावर जाहीर केलेली तात्पुरती उत्तरतालिका लिंक हटवण्याची नामुश्की सेट विभागावर आली. त्यानंतर पुन्हा तीन तासानंतर विभागाने तात्पुरती उत्तरतालिका लिंक संकेतस्थळावर जाहीर केली.
प्रत्येक प्रश्नाच्या आक्षेपासाठी दोनशे रुपये
तात्पुरत्या उत्तरतालिकेतील चुकीच्या उत्तरांवर आक्षेप नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नामागे दोनशे रुपये शुल्क भरावे लागतेे. शुल्क भरल्यानंतर आक्षेप बरोबर अथवा चुकीचा असला तरी शुल्क परत केले जात नाही. उत्तरांवर आक्षेप असताना प्रत्येक प्रश्नासाठी एवढे शुल्क भरायचे कसे, असा सवाल विद्यार्थी करत आहेत. तात्पुरत्या उत्तरतालिकेतील त्रुटींची जबाबदारी विद्यार्थ्यांवर टाकून त्यांच्याकडून प्रत्येक आक्षेपासाठी शुल्क आकारणे कितपत योग्य, अशी नाराजी विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
Related
Articles
लक्ष्मीपूजन धडाक्यात सणाचा उत्साह शिगेला
09 Nov 2026
तर ‘गोकूळ’च्या अध्यक्षपदाचा तिढा सुटेल : मुख्यमंत्री
08 Nov 2026
युरोप दौर्यात बॅडमिंटनपटूंना करावा लागला आर्थिक अडचणींचा सामना
04 Nov 2026
सीएसके आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चार खेळाडूंची अदलाबदल
06 Nov 2026
झेंडू व शेवंतीने भाव खाल्ला : आवक घटली
09 Nov 2026
वाहनावरील दंडाच्या थकबाकी वसुलीसाठी सरकारची अभय योजना
05 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित