E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
नानावाड्याच्या संवर्धनासाठी 60 लाखांचा खर्च : भिमाले
Wrutuja pandharpure
01 Nov 2026
पुणे
: शहराच्या ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेल्या नानावाड्याच्या जतन आणि संवर्धनाच्या उर्वरित कामांसाठी पुणे महापालिकेकडून सुमारे 60 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. नानावाड्यातील दर्शनी भाग आणि दगडी इमारतीच्या दुरुस्तीची कामे या टप्प्यात हाती घेण्यात येणार असून, त्यासाठी महापालिकेच्या भवन आणि हेरिटेज विभागाने निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. असे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
नानावाडा ही पुण्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशातील महत्त्वाची वास्तू आहे. या वास्तूचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी महापालिकेकडून टप्प्याटप्प्याने कामे केली जात आहेत. त्याचाच पुढील भाग म्हणून दर्शनी भाग आणि दगडी इमारतीतील उर्वरित दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. यासाठी 59 लाख 94 हजार 742 रुपयांची तरतूद उपलब्ध असून, तेवढ्याच रकमेचे पूर्वगणनपत्रक तयार करण्यात आले आहे. या कामांत इमारतीच्या दर्शनी भागातील खिडक्यांना लाकडी छज्जे बसविणे, त्यावर केम्प्रोल वॉटरप्रूफिंग करणे, छताची गळती रोखण्यासाठी दुरुस्ती करणे, रेकॉर्ड रूमची दुरुस्ती आणि रंगरंगोटी आदी कामांचा समावेश आहे. पावसामुळे छतामधून होणारी पाण्याची गळती तसेच इमारतीच्या दर्शनी भागातील दुरुस्तीची कामे केल्यामुळे वास्तूचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे.
या कामासाठी दोन निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी दोन्ही निविदाधारक पात्र ठरले. निविदेतील जीएसटीची रक्कम 9 लाख 14 हजार 361 रुपये आहे. या कामासाठी 29 जून 2026 रोजी खातेप्रमुखांची मान्यता घेण्यात आली होती. तसेच निविदा प्रक्रियेला संबंधित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. नानावाड्याच्या जतन-संवर्धनाची उर्वरित कामे पूर्ण झाल्यानंतर या ऐतिहासिक वास्तूला अधिक चांगले स्वरूप प्राप्त होण्याबरोबरच पर्यटक आणि नागरिकांना उपलब्ध सुविधांचा लाभ घेता येणार आहे. ऐतिहासिक वास्तूचे मूळ स्वरूप जपतानाच तिचे संरक्षण आणि देखभाल करण्याच्या दृष्टीने हा टप्पा महत्त्वाचा ठरणार आहे.
Related
Articles
रविंद्रनाथ टागोर यांच्या शिल्पावर शाई फेकली
08 Nov 2026
सौदी अरेबियाने हवेतच रोखली क्षेपणास्त्रे
09 Nov 2026
दहा महिन्यात 14 सराईत गुन्हेगारांविरूद्ध मकोका
08 Nov 2026
किरकोळ वादातून मुलाकडून वडिलांचा खून
08 Nov 2026
दीपोत्सवातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना
07 Nov 2026
बंगालमध्ये स्फोटकांचा साठा जप्त
06 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)