E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
दिवाळीच्या गर्दीत प्रवाशांची लूट रोखण्यासाठी आरटीओ मैदानात
Wrutuja pandharpure
01 Nov 2026
खासगी बसच्या भाडेवाढीवर राहणार करडी नजर!
पुणे
: दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाण्यासाठी खासगी बसचा पर्याय निवडणार्या प्रवाशांना आता मनमानी भाडेवाढीचा फटका सहन करावा लागणार नाही. सणासुदीच्या गर्दीचा फायदा घेत प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करणार्या खासगी बसचालकांना चाप लावण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. 23 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत ही मोहीम सुरू राहणार असून, बसस्थानकांपासून ते ऑनलाइन तिकीट बुकिंगपर्यंत आरटीओकडून लक्ष ठेवले जाणार आहे.
खासगी कंत्राटी प्रवासी वाहनांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) संबंधित संवर्गाच्या भाडेदरापेक्षा दीडपट अधिक भाडे आकारण्याची मर्यादा आहे. मात्र, या मर्यादेचे उल्लंघन करून जादा पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे आता बसमालकांना प्रत्येक मार्गासाठी प्रती आसन आकारण्यात येणार्या कमाल भाड्याचा तक्ता बस सुटण्याच्या ठिकाणी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या मोहिमेच्या अनुषंगाने 23 ऑक्टोबर रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बस असोसिएशनच्या 26 प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीत भाडेदरांच्या नियमांसह वाहनांची कागदपत्रे, चालकांचे बॅज, वाहनांचा फिटनेस, पीयूसी, विमा, वेगमर्यादा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या. बसमध्ये अग्निशामक यंत्रणा आणि प्रथमोपचार पेटी असणेही आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
ऑनलाइन बुकिंगवरही आरटीओची नजर
केवळ रस्त्यावर धावणार्या बसची तपासणी करून ही मोहीम थांबणार नाही. तिकीट बुकिंग कार्यालयांनाही भेटी देऊन ऑनलाइन आणि ऑफलाइन तिकिटांची तपासणी केली जाणार आहे. काही बुकिंग पच्या माध्यमातून निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त भाडे आकारले जात असल्यास संबंधितांवरही कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रवाशांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र व्हॉट्सप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. 8275330101 या क्रमांकावर प्रवासी आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करताना नाव, मोबाइल क्रमांक आणि तिकिटाचा फोटो पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील प्रमुख ठिकाणी तपासणी पथके तैनात
आरटीओने तपासणीसाठी रस्ता सुरक्षा पथकांची नियुक्ती केली आहे. स्वारगेट, वाघेश्वर पार्किंग, हडपसर, बालेवाडी, मुंबई महामार्ग, येरवडा, चंदननगर, सातारा रोड, संगमवाडी पार्किंग आणि वाकडेवाडी या भागांत वाहनांची तपासणी सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जात असून, काही वाहनांना दंडही ठोठावण्यात आला आहे.
Related
Articles
राज्य टेनिक्वाइट स्पर्धेत पुण्याचे वर्चस्व
05 Nov 2026
वीज समस्येविरोधात ग्रामस्थांचा एल्गार
06 Nov 2026
शेख हसीना परतणार? (अग्रलेख)
10 Nov 2026
झाडणकामाच्या मुदतवाढीला महापालिका आयुक्तांकडून ’ब्रेक’
05 Nov 2026
शौर्या अंबुरेची ऐतिहासिक कामगिरी
10 Nov 2026
एनव्हिडियाच्या सीईओचे चिनी हेरासोबत संबंध
11 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)