E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
सारसबाग-पर्वती रोपवेसाठी सल्लागार नियुक्तीला ’स्थायी’ची मान्यता
Wrutuja pandharpure
01 Nov 2026
पुणे
: सारसबाग ते पर्वती रोप-वे प्रकल्पासाठी महापालिकेकडून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांनी दिली. प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करणे, तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासणे आणि निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे.
शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महापालिकेने सारसबाग ते पर्वती रोप-वे प्रकल्प प्रस्तावित केला आहे. त्यासाठी 2026-27 च्या अंदाजपत्रकात एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रोप-वे प्रकल्प इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल तंत्रज्ञानावर आधारित असल्याने महापालिकेकडे आवश्यक तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यामुळे प्रकल्पाच्या नियोजनापासून निविदा प्रक्रियेपर्यंतची जबाबदारी सल्लागारावर सोपविण्यात येणार आहे. सल्लागार नियुक्तीसाठी महापालिकेने ऑगस्ट 2026 मध्ये निविदा मागविल्या होत्या. सल्लागाराला प्रकल्पाच्या रकमेच्या 1.27 टक्के किंवा किमान दोन कोटी 54 लाख रुपये यापैकी अधिक असलेली रक्कम शुल्क म्हणून देण्याचे प्रस्तावित आहे. त्यावर जीएसटी आणि अन्य लागू कर अतिरिक्त असतील.
सल्लागाराकडून प्रकल्पाच्या जागेची पाहणी, सविस्तर प्रकल्प अहवाल , अंदाजपत्रक आणि निविदेच्या अटी-शर्ती तयार करण्यात येणार आहेत. तसेच प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय परवानग्यांची प्रक्रिया निश्चित केली जाणार आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारीतून किंवा डीबीएफओटी पद्धतीने राबविणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरेल का, याचाही अभ्यास करण्यात येणार आहे. निविदांमध्ये सहभागी होणार्या कंपन्यांचे तांत्रिक आणि आर्थिक मूल्यमापन करून कार्यादेश देण्यापर्यंतची प्रक्रिया सल्लागारामार्फत पूर्ण करण्यात येणार आहे.
दरम्यान, प्रस्तावित आराखड्यानुसार पेशवे पार्क ते पर्वतीदरम्यान सुमारे 750 मीटर लांबीचा रोप-वे उभारण्याचे नियोजन आहे. या मार्गावर 12 ते 40 मीटर उंचीचे पाच टॉवर आणि प्रत्येकी आठ प्रवाशांची क्षमता असलेल्या 22 केबिन प्रस्तावित आहेत. या रोप-वेमुळे अवघ्या अडीच मिनिटांत पर्वती गाठता येणार असून, एका दिशेने ताशी दीड हजार प्रवाशांची वाहतूक करणे शक्य होणार आहे. सल्लागाराच्या अहवालानंतर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
सल्लागाराकडे या जबाबदार्या
प्रकल्पाची तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासणे.
सविस्तर प्रकल्प अहवाल आणि अंदाजपत्रक तयार करणे.
पीपीपी आणि डीबीएफओटी पद्धतींचा अभ्यास करणे.
आवश्यक शासकीय परवानग्यांसाठी मार्गदर्शन करणे.
निविदांचे मूल्यमापन करून कार्यादेशापर्यंतची प्रक्रिया पूर्ण करणे.
असा असेल प्रस्तावित रोप-वे
मार्ग : पेशवे पार्क ते पर्वती
लांबी : 750 मीटर
टॉवर : 5
टॉवरची उंची : 12 ते 40 मीटर
केबिन : 22
प्रत्येक केबिनची क्षमता : 8 प्रवासी
प्रवासाचा कालावधी : अडीच मिनिटे
वाहतूक क्षमता : एका दिशेने ताशी 1,500 प्रवासी
Related
Articles
देशाची प्रगती पाहण्यासाठी सोनियांनी ’इटालियन चष्मा’ काढून टाकावा
08 Nov 2026
वाचक लिहितात
07 Nov 2026
प्रसाद
08 Nov 2026
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
05 Nov 2026
अमेरिकेच्या मिलनर शहरात पोलिसांचा सामूहिक राजीनामा
06 Nov 2026
महापौर कार्यालय आणि मेट्रो स्थानक बॉम्बने उडविण्याची धमकी
03 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित