E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
’मांडोत टॉवर्स’समोरील अनधिकृत भिंत जमीनदोस्त
Wrutuja pandharpure
01 Nov 2026
तब्बल 13 वर्षांनंतर महापालिकेची कारवाई
कोंढवा
: कोंढवा येथील ‘मांडोत टॉवर्स सोसायटी’च्या हक्काच्या जागेवर गेल्या 13 वर्षांपासून उभारण्यात आलेली अनधिकृत भिंत अखेर महानगरपालिकेने पाडून टाकली आहे. बांधकाम व्यावसायिक आणि स्थानिक हॉटेल चालकाच्या मनमानी कारभाराविरोधात रहिवाशांनी दिलेल्या दीर्घ आणि तीव्र संघर्षानंतर ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे रहिवाशांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
बांधकाम व्यावसायिकाने मांडोत टॉवर्स सोसायटीच्या जागेत आणि रस्त्यावर तब्बल 13 वर्षांपूर्वी एक अनधिकृत भिंत उभारली होती. इतकेच नव्हे तर ही बेकायदेशीर जागा त्याने स्थानिक ’गोकुळ हॉटेल’च्या चालकाला व्यावसायिक वापरासाठी भाड्याने दिली होती. या अनधिकृत हॉटेलमुळे सोसायटीतील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी तसेच पार्किंगसाठी प्रचंड मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत होते.
रहिवाशांवर खोटे गुन्हे, तरीही संघर्ष सुरूच
सोसायटीच्या रहिवाशांनी जेंव्हा या अनधिकृत बांधकामाला आणि हॉटेल चालकाला विरोध केला, तेव्हा त्यांना धमकावण्याचा प्रयत्न झाला. रहिवाशांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर उलट गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, हक्काच्या जागेसाठी मांडोत टॉवर्समधील नागरिकांनी कायदेशीर लढा आणि पालिकेकडे पाठपुरावा सुरूच ठेवला.
पालिकेकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा
सोसायटीची जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी रहिवाशांच्या वतीने प्रविण ओसवाल, चंद्रकांत जैन, गणेश कर्नावट, अतुल कर्नावट आणि ऋषभ मेहता यांनी पुढाकार घेतला. त्यांनी रहिवाशांच्या स्वाक्षर्यांचे मागण्यांचे निवेदन पालिकेच्या अतिक्रमण विभागाला दिले आणि पुराव्यांसह तीव्र लढा दिला. अखेर या संघर्षाची दखल घेत पालिकेने पोलीस बंदोबस्तात ही अनधिकृत भिंत पाडून जागा मोकळी केली. नागरिकांच्या एकजुटीमुळे 13 वर्षांचे हे अतिक्रमण हटवण्यात प्रशासनाला यश आले असून, परिसरात या कारवाईचे स्वागत केले जात आहे.
Related
Articles
अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीसाठी मतदान
04 Nov 2026
सोमालियाजवळ मासेमारी नौकेची समुद्र चाच्यांच्या तावडीतून सुटका
04 Nov 2026
दिव्यांगांच्या हक्काची नोकरी नेमकं कोण खातंय?
05 Nov 2026
१५ वर्षांपासून रखडलेल्या पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला गती
09 Nov 2026
पदोन्नतीतील अनियमिततेची चौकशी पूर्ण होईपर्यंत आर्थिक लाभ रोखा
04 Nov 2026
श्रीनगरच्या लाल चौकामध्ये चार दहशतवाद्यांची छायाचित्रे
09 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित