बंडगार्डन: मुंढवा परिसरात उघड्यावर कचरा जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूर आणि वायू प्रदूषण होत असून, वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा परिसरात कचरा जाळण्यात आला असून, या आगीच्या ज्वाळा आता परिसरातील झाडाझुडपांपर्यंत पोहोचल्या आहेत.नागरिकांनी घटनांचे व्हिडिओ पुरावे देऊनही प्रशासनाकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. एकीकडे पर्यावरण संवर्धनाच्या गप्पा मारणारे प्रशासन डोळ्यांदेखत हिरवळीचे नुकसान होत असताना सुस्त का, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात असून, कचरा जाळणार्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
Fans
Followers