E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
क्रीडा
जुरेल शतकाच्या उंबरठ्यावर; भारत ‘अ’ 7 बाद 291
Wrutuja pandharpure
01 Nov 2026
पडिक्कलच्या 80 धावा
क्राइस्टचर्च
: ध्रुव जुरेलच्या नाबाद 99 आणि देवदत्त पडीक्कलच्या 80 धावांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंड अ संघाविरूद्ध दुसर्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारत अ संघाने 7 गडी गमावून 291 धावा केल्या. देवदत्त पडिक्कलने 80 धावा केल्या, तर साई सुदर्शनने 41 धावांची खेळी केली. न्यूझीलंड-Aचा वेगवान गोलंदाज फ्रेझर शीटने 50 धावा देत 4 गडी बाद केले. भारतीय संघ अडचणीत सापडला होता. 160 धावांपर्यंत संघाने 6 गडी गमावले होते.
दुपारच्या सत्रात अवघ्या 6 चेंडूंच्या अंतरात 3 गडी बाद झाल्याने संघावर दबाव वाढला होता. अशा परिस्थितीत जुरेलने मैदानावर ठामपणे उभे राहत डावाची जबाबदारी स्वीकारली. त्याने मानव सुथारसोबत सातव्या गड्यासाठी 62 धावांची भागीदारी केली. सुथारने 22 धावा केल्या. त्याच्या बाद झाल्यानंतर जुरेलने आकाश दीपसोबतही महत्त्वाची भागीदारी केली. या दोघांनी आठव्या विकेटसाठी 69 धावा जोडल्या. दिवसाचा खेळ संपेपर्यंत जुरेल 99 धावांवर नाबाद राहिला. मागील अनधिकृत कसोटीच्या दोन्ही डावांत अनुक्रमे 1 आणि 2 धावा करणार्या जुरेलने या सामन्यात दमदार पुनरागमन केले.
देवदत्त पडिक्कलने न्यूझीलंड-Aच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत 80 धावा केल्या. 140 चेंडूंच्या खेळीत त्याने 12 चौकार लगावले. मागील अनधिकृत कसोटीच्या दुसर्या डावात 199 धावांची खेळी करणार्या पडिक्कलने या सामन्यातही चांगली फलंदाजी केली. साई सुदर्शनसोबत त्याने दुसर्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांच्या स्विंगचा सामना करत दोघांनीही डावाला स्थैर्य मिळवून दिले. पडिक्कलने 100 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. यशस्वी जायस्वालला या डावातही खाते उघडता आले नाही.
सिराज, मुकेश, मानव यांना संधी
दुसर्या अनधिकृत कसोटी सामन्यासाठी इंडिया-Aने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले. मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि मानव सुथार यांचा संघात समावेश करण्यात आला. केएल राहुल आणि अंशुल कंबोज हे वनडे मालिकेतील व्यस्ततेमुळे या सामन्यासाठी निवडीस उपलब्ध नव्हते.
Related
Articles
अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानचा विजय
09 Nov 2026
52 वृक्ष तोडण्यास नियमबाह्य परवानगी दिल्याबद्दल मुख्य उद्यान अधीक्षकांना नोटीस
09 Nov 2026
हजारो पणत्यांच्या प्रकाशाने उजळला पर्वती परिसर
07 Nov 2026
अरुण लाल यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार
08 Nov 2026
सोमवती यात्रेनिमित्त खंडोबाचे दुपारी बारा वाजता कर्हा स्नान
07 Nov 2026
विराटच्या अर्धशतकीय खेळीने भारताचा विजय
05 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित