पहिल्या तीन सामन्यांत आकिबचा समावेश   

नवी दिल्ली : वेगवान गोलंदाज आकिब नबी याचा न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या तीन वनडे सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट संघात समावेश करण्यात आला आहे. प्रसिद्ध कृष्णा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे पाच सामन्यांच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे त्याच्या जागी आकिब नबीला संधी देण्यात आली आहे.
 
यापूर्वी आकिब नबीची निवड चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यांसाठी करण्यात आली होती. मात्र, आता तो पहिल्या सामन्यापासूनच निवडीसाठी उपलब्ध असेल. मालिकेतील पहिला सामना 4 नोव्हेंबर रोजी ऑकलंड येथे खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, या वेगवान गोलंदाजाची निवड यापूर्वी चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यांसाठी करण्यात आली होती. मात्र, आता तो वनडे मालिकेच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघाचा भाग असेल.’ जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी याने अलीकडेच लिंकन येथे न्यूझीलंड ’अ’ संघाविरुद्ध भारत ’अ’ संघाकडून चार दिवसीय सामना खेळला होता. 
 
तीन वनडे सामन्यांसाठी संघ : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, गुरनूर बरार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, ईशान किशन, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी (केवळ पहिला वनडे सामना), आकिब नबी.

Related Articles