E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
विदेश
इस्रायलमध्ये सरकार कोणाचे?
Samruddhi Dhayagude
31 Oct 2026
बहुमताअभावी सत्ता स्थापनेचा पेच कायम
तेलअविव : इस्रायलमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सरकार कोणाचे बनणार ? असा पेच निर्माण झाले आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखालील लिकुड पक्षाच्या आघाडीने सर्वाधिक ५३ जागा मिळविल्या असून त्यांचे प्रतिस्पर्धी आणि याशार पक्षाचे नेते माजी लष्कर प्रमुख गादी आयसनकोट यांच्या आघाडीने ४८ तर दोन अरब पक्षांच्या आघाडीने १९ जागा जिंकल्या आहेत.
संसदेच्या १२० जागा आहे. सर्वाधिक ५३ जागा जिंकूनही नेतन्याहू यांची आघाडी ६१ या बहुमताच्या आकड्यापासून दूरच आहे. प्रमुख विरोधी पक्ष गादी आयसनकोट याच्या याशर पक्षाला स्वबळावर २१ जागा मिळाल्या आहेत. माजी पंतप्रधान नाफ्ताली बेनेट यांच्या बी यादड पक्षाला १२ जागा, यायर गोलानचे डेमोक्रॅट्स पक्षाला आठ आणि एविगडोर लिबरमनचा इस्राएल बेतेनु यांना सात जागा मिळाल्या आहेत. दोन अरब पक्षांना अनुक्रमे ११ आणि आठ जागा मिळाल्या आहेत. ंमंगळवारी मतदान झाले होते. तेव्हा ७७.९ टक्के मतदान झाले होते. ५७ लाख १६ हजार ६६५ जणांनी मतदान केले होते.
दरम्यान, अध्यक्ष आयझॅक हझाँग यांना ४ नोव्हेंबर रोजी निकाल सोपविला जणार आहे. ते निवडणूक विषयक तक्रारी निकालात काढतील आणि नेत्यांची भेट घेतील. खासदार ज्या नेत्याची पंतप्रधान पदासाठी शिफारस करतील त्यांना सरकार स्थापन करण्यास बोलावतील.
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना पुन्हा सरकार स्थापन करायचे झाल्यास आठ जागा कमी पडत आहेत. बहुमतासाठी ६१ जागा आवश्यक असून त्यांच्या लुकिड पक्षांच्या आघाडीला ५३ जागा मिळाल्या आहेत. ते बहुमताचा आकडा कोणत्या पक्षाच्या मदतीने पूर्ण करतात ? याकडे आता जगाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे आयसनकोट देखील सत्तेच्या शर्यतीत आहेत. त्यांना दोन अरब पक्ष किंवा अन्य पक्ष पाठिंबा देतील का? असाही प्रश्न आहे.
Related
Articles
अजित पवारांनी विलीनीकरणाची तारीख सांगितली होती
09 Nov 2026
बावधनमध्ये खंडीत वीजपुरवठ्याने नागरिक त्रस्त
07 Nov 2026
प्रेमा रावतचा वेगवान अर्धशतकाचा विक्रम
04 Nov 2026
कळसपिंपरीत दहा क्विंटल कापूस जळून खाक
09 Nov 2026
बंडगार्डन पुलाचे विद्रुपीकरण
04 Nov 2026
बांधकाम परवानगी शुल्कातून महापालिकेच्या तिजोरीत 1 हजार 700 कोटी
09 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित