ब्रिटनचा नगरसेवक पाकिस्तानमध्ये ताब्यात   

लाहोर  : ब्रिटनच्या मजूर पक्षाचे नगरसेवक दालात अली यांना पाकिस्तानमधून बाहेर पडण्यापासून रोखण्यात आले. ते मूळचे पाकिस्तानी वंशाचे नागरिक असून नंतर ब्रिटनमध्ये राहात होते. 
 
पकिस्तानच्या दौरा आटपून ते तीन दिवसांपूर्वी लाहोर विमानतळा-वरून ते ब्रिटनमध्ये रवाना होण्याच्या तयरीत होते. तेव्हा त्यांना अधिकार्‍यांनी अडवले, विमानात बसण्यापासून रोखले आणि ताब्यात घेतले. रोचडेल परिषदेचे उपनेते असलेल्या दलात अली यांना पारपत्र विभागाच्या अधिकार्‍यांनी त्यांचे नाव ’फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’च्या यादीत असल्याचे सांगितले. 
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी काश्मिरी नागरिकांना त्यांनी पाठिंबा दिला होता. तो रागही पाकिस्तान सरकारच्या मनात होता. त्यातून ही कारवाई केल्याचे मानले जात आहे. 

Related Articles