E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
देश
केरळममध्ये मुदतवाढीस नकार
Samruddhi Dhayagude
31 Oct 2026
नवी दिल्ली : केरळममधील मतदार यादी विशेष तीव्र पडताळणी (एसआयआर) प्रक्रियेस मुदतवाढ देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. पण, त्याचवेळी मतदारांची नावे वगळल्यासंदर्भातील तक्रारींची तपासणी करण्याचे निर्देश न्यायालयाने निवडणूक आयोगास दिले.
सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची, न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या पीठासमोर याबाबतचा अर्ज तपासणीसाठी होता.मतदार यादीत दुरुस्ती आणि नवीन मतदारांचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने मुदतवाढ देण्याची गरज नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. पण, जे विहित मुदतीत आपले अर्ज भरू शकले नव्हते. त्यांनी आपली माहिती आयोगाकडे सादर करावी आणि निवडणूक आयोगाने अशा तक्रारी किंवा निवेदने तपासून न्यायालयासमोर अहवाल सादर करावा, असेही नमूद केले. तसेच, मतदार यादीतून मोठ्या प्रमाणावर नावे वगळल्याच्या आरोपांवर उत्तर देण्यासाठी न्यायालयाने निवडणूक आयोगाला चार आठवड्यांचा वेळ दिला. निवडणूक आयोगाद्वारे विविध राज्यांत एसआयआर प्रक्रिया राबवली जात आहे. यास अनेकांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर, सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेत आहे.
Related
Articles
उद्योजक राणा सूर्यवंशी यांची ’वाय प्लस’सुरक्षा हटवली
03 Nov 2026
महमद शमी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त
08 Nov 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील तिसऱ्या अपत्याचा नियम रद्द होणार?
04 Nov 2026
पंजाबमधील ‘आप’चे तीन बंडखोर आमदार भाजपमध्ये
03 Nov 2026
लक्ष्मीपूजनाच्या साहित्याने बाजारपेठ सजली
08 Nov 2026
८७ लाख शेतकर्यांच्या खात्यात ४,३७३ कोटी दिवाळी मदत जमा
07 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित