E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
देश
‘इंडिया’ आघाडीतर्फे आज जन महाभियोग
Samruddhi Dhayagude
31 Oct 2026
नवी दिल्ली : ‘इंडिया’ आघाडीतर्फे आयोजित ‘अभिरूप संसद’ कार्यक्रम पावसामुळे एक दिवस पुढे ढकलण्यात आला असून, आज ‘जन महाभियोग’ हा कार्यक्रम होणार असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी सांगितले. मतदार यादी विशेष तीव्र पडताळणी (एसआयआर) मोहीम रद्द करण्यात यावी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तातडीने हटविण्यात यावे, या मागणीसाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या ‘१०-राजाजी मार्गा’वरील निवासस्थानी काल ‘अभिरूप संसद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पीठासीन अधिकारी म्हणून लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार काम पाहणार आहेत. काल पावसामुळे हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला. खर्गे यांच्या निवासस्थानाबाहेर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत राहुल यांनी याबाबतची माहिती दिली. ज्येष्ठ नेत्यांना पावसात बसणे त्रासदायक असल्याने आम्ही हा कार्यक्रम एक दिवसासाठी पुढे ढकलण्याचा सर्वसंमतीने निर्णय घेतला असल्याचे राहुल म्हणाले.
Related
Articles
‘द पुणे फाऊंटन पेन शो’तर्फे हस्ताक्षर स्पर्धेचे परितोषिक वितरण
07 Nov 2026
मुसळधार पावसाने बारामतीला झोडपले
03 Nov 2026
वाचक लिहितात
05 Nov 2026
निवडणुकीपूर्वी इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत होते नेतन्याहू
09 Nov 2026
‘रेजिम चेंज’ म्हणजे लोकशाही राजकीय व्यवस्था बदलण्याचे कारस्थान
03 Nov 2026
स्वातंत्र्यलढ्यातील तरुणांचे स्फूर्तीस्थान - दामोदर भिडे
06 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित