भुवनेश्वर : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात शुक्रवारी अर्णब चक्रीवादानंतर दरड कोसळल्याने एकात कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. यात नऊ महिन्यांचा बाळाचा समावेश आहे. रायकिया ब्लॉकमधील डांगेसी गावात ही घटना घडली. या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन जणांची सुटका केली, अशी माहिती ओडिशाचे पंचायत राज मंत्री रवी नारायण नाईक यांनी दिली. या दुर्घटनेत अच्युत प्रधान (३०), त्यांची पत्नी अनिशा प्रधान (२५) आणि त्यांच्या नऊ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी दुःख केले आहे. तसेच, मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची आर्थिक मदत जाहीर केली.
Fans
Followers