भारत नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषदेचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन   

नवी दिल्ली : आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओदिशा, राजस्तान, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसह एकूण तेरा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या शिखर परिषदेत सहभागी होत याद्वारे नवीकरणीय ऊर्जेची क्षमता, गुंतवणुकीच्या संधी आणि उत्पादन क्षमता प्रदर्शित करतील. ’नॅशनल हॅकेथॉन’, नवीकरणीय ऊर्जेवर आधारित प्रश्नमंजुषा आणि ’आरई-जेन पॅव्हेलियन’ ही  या परिषदेतील मुख्य आकर्षणे असतील.
 
केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे नवी दिल्ली येथील ’भारत मंडपम’ येथे हा कार्यक्रम होईल.केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव संतोष सारंगी म्हणाले,  भारताचे स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने  संक्रमण एका निर्णायक टप्प्यात प्रवेश करत आहे. 
 
भारत नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषद आणि प्रदर्शन २०२६ हे जागतिक भांडवल, तंत्रज्ञान आणि औद्योगिक कौशल्य यांना भारतातील स्वच्छ ऊर्जेच्या वाढत्या संधींशी जोडण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून देईल, याद्वारे गुंतवणुकीच्या संभाव्य संधींचे रूपांतर प्रकल्प, भागीदारी आणि प्रगतीमध्ये होईल. ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, युरोपियन युनियन, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, नॉर्वे, स्वीडन आणि युनायटेड किंगडम हे भागीदार देश म्हणून सहभागी होणार आहेत. 
 

Related Articles