अहमदाबाद : प्रभास पाटन (वेरावळ) येथील सोमनाथ मंदिराच्या ५०० मीटर परिसरात आणि काही विशिष्ट रस्त्यांवर मांसाहारी खाद्यपदार्थांची विक्री, साठवणूक, तयार करणे आणि वाटप करण्यावर बंदी घालण्यात आली होती. ती बंदी गुजरात उच्च न्यायालयाने आदेश काढून रद्द केली अहे. राज्य सरकारने जुलै/ऑगस्ट २०२६ मध्ये मंदिर परिसरात मांसाहारी पदार्थ विकाता येणार नाहीत, असे आदेश काढले होते. ते गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश निशा एम. ठाकोर यांनी रद्द करण्याचा निकाल दिला. रेस्टॉरंट मालकांनी आव्हान अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये बंदीमुळे उपजीविकेवर गंभीर संकट आले असल्याचे म्हटले होते.
Fans
Followers