सारसबागेजवळ सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटली   

पुणे : मागील पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २५ वर्षीय तरुणाचा सारसबागेजवळ मोटारीमध्ये मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.  पूर्ववैमनस्यातून घातपात की आणखी काही? याबाबत पोलिसांकडून तपास सुरू असून सारसबागेजवळ शुक्रवारी सकाळी मोटारीमध्ये सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
 
शुभ्रत बाळासाहेब बनसोडे (वय २५, रा. कवडी गाव, लोणी काळभोर) असे त्याचे नाव आहे. शुभ्रतचा मृत्यू कसा झाला याची माहिती पुढील तपासणीनंतर समजणार आहे. त्यामागे पूर्ववैमनस्य की आणखी काही कारण आहे का? याचा पोलीस तपास करत आहेत. याबाबत त्याचा भाऊ शुभम बाळासाहेब बनसोडे (वय २८, रा. कवडी गाव, मांजरी फार्म, हडपसर) यांनी हडपसर ठाण्यात फिर्याद दिली.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभ्रत बनसोडे हा २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता रिक्षाचालक वडिलांचा जेवणाचा डबा घेऊन घरातून निघाला. हडपसर गाडीतळावरील रिक्षा स्टॅन्डजवळ त्याने वडिलांना डबा दिला आणि घरी परत जात आहे, असे सांगून तो निघून गेला. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सौरभ कडु या त्याच्या मित्राला फोन करुन त्याने हडपसर गावामध्ये भेटण्यासाठी ये असे सांगितले. तो तिथे गेला असता, मी चाललो असे त्याने सांगितले. 
 

Related Articles