E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
पुण्याच्या पाणी नियोजनावर प्रश्नचिन्ह
Samruddhi Dhayagude
31 Oct 2026
मंत्र्यांसह आमदारांच्या अनुपस्थितीचा मागितला जाब
पुणे : शहराच्या पुढील दहा महिन्यांच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीनंतरही पुणेकरांच्या पाण्याबाबतचे प्रश्न अनुत्तरित आहेत. खडकवासला धरणसाखळीत सुमारे २४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असताना शहरासाठी नेमके किती पाणी राखून ठेवण्यात आले, त्याचे नियोजन काय आणि या महत्त्वाच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी पुणेकरांच्या पाणीप्रश्नावर कोणती भूमिका मांडली, असे सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी या बैठकीच्या अनुषंगाने प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
शहराच्या पाणीपुरवठ्याशी थेट संबंध असलेल्या या बैठकीला राज्य मंत्रिमंडळातील मंत्री चंद्रकांत पाटील आणि माधुरी मिसाळ यांना निमंत्रण होते का, असा प्रश्न वेलणकर यांनी उपस्थित केला आहे. निमंत्रण नसेल तर त्याचे कारण काय आणि निमंत्रण असूनही दोन्ही मंत्री उपस्थित नसतील तर त्यामागील कारण काय, याचा खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पुण्याच्या पाण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे काम कोणते होते, असा सवालही त्यांनी केला.
शहरातून विधानसभेवर निवडून गेलेल्या आठ आमदारांपैकी केवळ तीन आमदार बैठकीला उपस्थित असल्याचे दिसून आले आहे. उर्वरित पाच आमदारांनी बैठकीला दांडी का मारली? उपस्थित आमदार आणि महापौरांनी पुणेकरांच्या वतीने कोणते मुद्दे मांडले आणि त्यावर कोणते निर्णय झाले, याची माहिती नागरिकांना मिळाली पाहिजे, असे वेलणकर यांनी म्हटले आहे.
१३ टीएमसी पाण्याचा कालावधी कोणता?
खडकवासला धरणसाखळीत उपलब्ध असलेल्या सुमारे २४ टीएमसी पाण्याचे नियोजन कसे करण्यात आले, याबाबतही स्पष्टता आवश्यक आहे. पुणे शहरासाठी १३ टीएमसी पाणी राखून ठेवल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, हा साठा १ नोव्हेंबर २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२७ या कालावधीसाठी आहे की १ जुलै २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२७ या कालावधीसाठी, याचा स्पष्ट खुलासा झालेला नाही.
Related
Articles
‘कोलगेट-पामोलिव इंडिया’च्या नफ्यात वाढ
06 Nov 2026
डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ल क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन
06 Nov 2026
फॉर्म ६ मधून आता घोषणापत्र स्वतंत्र
05 Nov 2026
प्रेमा रावतचा वेगवान अर्धशतकाचा विक्रम
04 Nov 2026
शेतकर्यांना धान्य, फराळ आणि आकाशकंदीलही भेट
05 Nov 2026
सीएसके आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चार खेळाडूंची अदलाबदल
06 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित