E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
‘प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालेच पाहिजे’
Samruddhi Dhayagude
31 Oct 2026
पुणे : शिक्षणामुळे माणसाचे जीवन बदलते, तर दर्जेदार शिक्षणामुळे देशाचे भविष्य घडते. प्रत्येक शैक्षणिक पदवीची विश्वासार्हता टिकली पाहिजे. प्रत्येक पदवीधर विद्यार्थी भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम असला पाहिजे. शिक्षणाचा दर्जा हा वर्गातील अध्यापन, शिक्षणपद्धती आणि विद्यार्थ्यांच्या कामगिरीतून दिसून आला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची सामाजिक किंवा आर्थिक पार्श्वभूमी कोणतीही असली, तरी दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि आशिया-पॅसिफिक गुणवत्ता नेटवर्क (एपीक्यूएन) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आशिया-पॅसिफिक गुणवत्ता नेटवर्क (एपीक्यूएन) शैक्षणिक परिषद २०२६ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ‘वेगाने बदलणार्या उच्च शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता सुनिश्चितीचा नव्याने विचार’ या संकल्पनेवर आधारित या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेच्या (नॅक) कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष प्रा. नागेश्वर राव विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंबायोसिसचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. शां. ब. मुजुमदार उपस्थित होते. तसेच एपीक्यूएनच्या अध्यक्षा डॉ. गॅलिना मोटोव्हा, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या कुलपती डॉ. विद्या येरवडेकर आणि कुलगुरू डॉ. रामकृष्णन रामन उपस्थित होते.
पाटील म्हणाले, विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना ज्ञान, व्यावहारिक कौशल्ये आणि स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता दिली पाहिजे. यामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षकांना सातत्याने नवनवीन ज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडत आहेत.
प्रा. नागेश्वर राव म्हणाले, शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन केवळ पायाभूत सुविधांवर नव्हे, तर प्रत्यक्ष शैक्षणिक परिणामांवर आधारित असले पाहिजे. मोठे परिसर आणि अत्याधुनिक सुविधा म्हणजेच दर्जेदार शिक्षण असे नाही. विद्यार्थ्यांची कामगिरी हा शिक्षणाच्या गुणवत्तेचा खरा निकष आहे. किती विद्यार्थी रोजगारक्षम झाले? त्यांनी कोणती कौशल्ये आत्मसात केली? शिक्षणामुळे त्यांच्या जीवनात कोणते सकारात्मक बदल घडले? या प्रश्नांच्या आधारे शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन झाले पाहिजे. संस्थांनी संगणकीय शिक्षण, कौशल्य विकास आणि प्रत्यक्ष कामातून प्रशिक्षण देणार्या योजनांचा प्रभावी वापर केला पाहिजे. उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सातत्यपूर्ण सुधारणा आवश्यक आहेत, असेही राव यांनी सांगितले.
Related
Articles
वर्षभरात ३०० हून अधिक जणांना अटक
11 Nov 2026
लक्ष्मीपूजनानिमित्त व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये वहीपूजनाचा उत्साह
09 Nov 2026
पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्या; पाण्याचा काटकसरीने वापर करा
06 Nov 2026
महमद शमी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त
08 Nov 2026
इथेनॉल खरेदीतील दुहेरी प्राधान्यामुळे वाद
07 Nov 2026
अनुभवायला मिळावी सर्वस्पर्शी दिवाळी!
07 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)