सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक   

सारब्रुकेन (जर्मनी) : दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधूने हायलो ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत शानदार विजयासह उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र, मालविका बन्सोड आणि इशाराणी बरुआ यांचे आव्हान संपुष्टात आले. दुसरे मानांकन असलेल्या सिंधूने दुसर्‍या फेरीत फ्रान्सच्या रोजी ओक्टाविया पंचासारीचा अवघ्या २६ मिनिटांत २१-९, २१-६ असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत तिची लढत अमाली शुल्झशी होईल. मालविकाला कॅनडाच्या वेन यू झांगकडून ११-२१, १७-२१ असा ३१ मिनिटांत पराभव पत्करावा लागला. इशाराणीला डेन्मार्कच्या  लाइन होजमार्क कजर्सफेल्डने पराभूत केले.

Related Articles