भारत ‘अ’ संघाचा विजयासाठी प्रयत्न   

क्राइस्टचर्च : देवदत्त पडिक्कलचा शानदार फॉर्म आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे पुनरागमन यामुळे भारत ‘अ’ संघाची ताकद वाढली आहे. शनिवारी न्यूझीलंड ‘अ’विरुद्ध सुरू होणार्‍या दुसर्‍या अनौपचारिक चार दिवसीय कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयासाठी प्रयत्नशील असेल.
 
पहिल्या सामन्यात पडिक्कलने १९९ धावांची खेळी करत भारताला ११३ धावांवरून सावरले होते. त्याच्या खेळीमुळे भारताने दुसर्‍या डावात ५१६ धावा केल्या. यश राठोडनेही दोन्ही डावांत अनुक्रमे ४४ आणि ६६ धावा केल्या. साई सुदर्शनने दुसर्‍या डावात ९१ धावा करत पुनरागमन केले, तर वॉशिंग्टन सुंदरने अर्धशतक झळकावले. मात्र, यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांना सलामीला प्रभाव पाडता आला नाही. राहुल एकदिवसीय संघात दाखल होणार असल्याने दुसर्‍या सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी झारखंडचा २१ वर्षीय शिखर मोहनला संधी मिळण्याची शक्यता आहे. गोलंदाजीत अकीब नबीने सहा, तर अंशुल कंबोज आणि आकाश दीप यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. 

Related Articles