E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
क्रीडा
फिलिप्सचे वादळी शतक; डफीचे चार बळी
Samruddhi Dhayagude
31 Oct 2026
न्यूझीलंडचा दणदणीत विजय
भारताची मालिकेत ३-१ ने आघाडी
ऑकलंड : चौथ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने दमदार कामगिरी करत भारताचा ८७ धावांनी पराभव केला. ग्लेन फिलिप्सच्या वादळी शतकासह मायकेल ब्रेसवेलच्या आक्रमक खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने २५९ धावांचा विशाल डोंगर उभारला. प्रत्युत्तरात भारतीय संघाला केवळ १७२ धावांपर्यंतच मजल मारता आली. जेकब डफीने चार बळी घेत भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले. मात्र, सुरुवातीचे तीन सामने जिंकून भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ ने आघाडीवर आहे.
भारतीय संघाने सुरुवातीचे सलग तीन सामने जिंकून यापूर्वीच मालिकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. वेगवान गोलंदाज मयंक यादवने टिम सीफर्ट (३) आणि डॅरिल मिचेल (२४) यांना माघारी धाडत यजमान संघाला सुरुवातीलाच दोन धक्के दिले. यानंतर ग्लेन फिलिप्सने फिन अॅलन (३१) याच्यासोबत तिसर्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी करत डाव सावरला. ग्लेन फिलिप्सने अवघ्या ४९ चेंडूंमध्ये १०७ धावांची स्फोटक खेळी साकारली. मायकेल ब्रेसवेलनेही केवळ २५ चेंडूंमध्ये ६५ धावा ठोकत भारतीय गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी अवघ्या ४१ चेंडूंमध्ये ११५ धावांची तडाखेबंद भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने २० षटकांत ७ गडी गमावून २५९ धावा केल्या. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध कोणत्याही संघाने केलेली ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.
डफीने पहिल्याच षटकात दिले दोन धक्के़
२६० धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जेकब डफीने पहिल्याच षटकात संजू सॅमसन (४) आणि ईशान किशन (०) यांना बाद करत भारताला बॅकफूटवर ढकलले. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि अभिषेक शर्मा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी तिसर्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. मात्र, अभिषेक शर्मा १५ चेंडूंमध्ये २७ धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरही फार काळ मैदानावर टिकू शकला नाही. त्याने ११ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. पॉवरप्ले संपण्यापूर्वीच भारतीय संघाने ६१ धावांवर चार विकेट गमावल्या होत्या. जेकब डफीने २३ धावा देत चार गडी बाद केले.
अर्शदीपचे १५० बळी
भारताचा पराभव झाला असला, तरी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहसाठी हा सामना वैयक्तिक कामगिरीच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरला. अर्शदीपने या सामन्यात टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १५०वा बळी मिळवला. यासह टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५० गडी बाद करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला.
Related
Articles
वाचक लिहितात
10 Nov 2026
52 वृक्ष तोडण्यास नियमबाह्य परवानगी दिल्याबद्दल मुख्य उद्यान अधीक्षकांना नोटीस
09 Nov 2026
ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांचे निधन
08 Nov 2026
पंतप्रधानांकडून फडणवीस यांचे कौतुक
09 Nov 2026
दहावी, बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांना अर्जासाठी पुन्हा मुदतवाढ
05 Nov 2026
डिसेंबरमध्ये बांगला देशात परतणारच
06 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)