E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
संपादकीय
ऑनलाईन खरेदीचा धमाका
Samruddhi Dhayagude
31 Oct 2026
वृत्तवेध
या वर्षीच्या सण-उत्सवांच्या काळात ऑनलाईन खरेदीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ई-कॉमर्स कंपन्यांना यंदा उत्तम विक्रीची अपेक्षा असून, ग्राहक आता केवळ खरेदी न करता वस्तूची किंमत, मिळणार्या सवलती आणि दर्जा या बाबींचा बारकाईने विचार करून निर्णय घेत आहेत. मोठ्या शहरांसोबतच आता लहान शहरे आणि गावेसुद्धा या ऑनलाईन शॉपिंगच्या शर्यतीत वेगाने पुढे येत आहेत. वाढत्या किमतींमुळे ग्राहक विचारपूर्वक खर्च करत असले तरी इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये चांगल्या आणि प्रीमियम उपकरणांना मोठी मागणी राहण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर बहुतांश ग्राहक सवलतींच्या मोठ्या ऑफर्सची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
पूर्वी केवळ किराणा माल वेगाने पोहोचवण्यापुरती मर्यादित असलेली क्विक कॉमर्स सेवा आता फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि सौंदर्यप्रसाधने यांसारख्या क्षेत्रांमध्येही विस्तार करत आहे. त्यामुळे ऑनलाईन खरेदीची ही पर्वणी आता केवळ ठराविक सणांपुरती मर्यादित राहिलेली नाही. या खरेदीमध्ये दुसर्या आणि तिसर्या श्रेणीतील शहरांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. काही ई-कॉमर्स कंपन्यांची ८० टक्क्यांहून अधिक विक्री बिगरमेट्रो शहर आणि गावांमध्ये होत असून, येथील ग्राहक योग्य किमतीत उत्तम दर्जाच्या वस्तूंना पसंती देत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या राखीच्या सणातही एका प्रसिद्ध व्यासपीठावरून तब्बल तिप्पट म्हणजेच ७३ टक्के मागण्या छोट्या शहरांमधून नोंदवल्या गेल्या आहेत.
सणासुदीच्या या हंगामात ऑनलाईन बाजारपेठेत आलेल्या या तेजीचा मोठा फायदा रोजगारनिर्मितीच्या क्षेत्रातही पाहायला मिळत आहे. एका मोठ्या ई-कॉमर्स कंपनीने देशभरातील चारशेहून अधिक शहरांमध्ये १.६ लाखांपेक्षा जास्त हंगामी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत तर दुसर्या एका ऑनलाईन विक्री व्यासपीठाद्वारे दहा लाखांहून अधिक अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामध्ये विक्रेत्यांचे जाळे आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील कामांचा समावेश आहे. एकूणच या सणांच्या काळात ऑनलाईन व्यापारवृद्धीमुळे देशातील लहान शहरांमधील बाजारपेठांना नवे बळ मिळण्यासोबतच मोठ्या प्रमाणावर रोजगाराला चालना मिळत आहे.
Related
Articles
दहावी, बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांना अर्जासाठी पुन्हा मुदतवाढ
05 Nov 2026
आणीबाणी लादणे ही एक चूक होती;इंदिरा गांधींनाही असेच वाटले असावे...
08 Nov 2026
छावा
07 Nov 2026
फॉर्म ६ मधून आता घोषणापत्र स्वतंत्र
05 Nov 2026
बंगालवर 10 गडी राखून विजय
06 Nov 2026
उत्कर्ष
09 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)