E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
देश
विकसित भारत होईपर्यंत मोदी कुठेही जाणार नाहीत
Samruddhi Dhayagude
30 Oct 2026
बनासकाठातील फेरीत, मेळाव्यात घोषणांचे फलक झळकले
बनासकाठा : विकसित भारत होईपर्यंत मोदी कुठेही जाणार नाहीत, अशा घोषणांचे फलक गुजरातच्या बनासकाठा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत भिलडी येथे आयोजित मेेळाव्यात आणि फेरीवेळी शुक्रवारी फडकले.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बिहारची राजधानी पाटणामध्ये काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याचा समाचार जणू भाजप कार्यकर्ते आणि उपस्थित नागरिकांनी घेतल्याचे मानले जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी बनासकाठा जिल्ह्यातील भिलडी शहरात फेरी काढली आणि नंतर ते भारत गोवंश प्रजनन आणि संशोधन केंद्रातील शेतकरी मेळाव्यात सहभागी झाले होते. १४ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचा शिलान्यास आणि उद्घाटन केले. पंतप्रधान किसान योजनेचा २४ वा हप्ता प्रत्येकी सहा हजार रुपयांप्रमाणे १८ हजार कोटी रुपये दहा कोटी शेतकर्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन जमा केला. फेरीवेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरिक त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने आले होते. जोपर्यत भारत विकसित होत नाही तोपर्यंत मोदी कुठे जाणार नाहीत, देश जोपर्यत स्वयंपूर्ण होत नाही तोपर्यंत मोदी कुठेही जाणार नाहीत, जोपर्यंत देश आर्थिक महासत्ता बनणार नाही तोपर्यंत मोदी कुठेही जाणार नाहीत, असे त्या फलकांवर लिहिले होते.
हेलिपॅड ते बनास दुग्ध प्रकल्पापर्यंत पंतप्रधान मोदी यांनी उघड्या जीपमधून प्रवास केला. या वेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल आणि उपमुख्यमंत्री हर्ष संघवी होते.
शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवा : मोदी
शेवटच्या श्वासापर्यंत नागरिकांची सेवा करत राहणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भिलाडीतील मेळाव्यात स्पष्ट केले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पाटण्यातील कार्यकमात मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचा समाचार त्यांनी घेतला. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष देशात खते, स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई निर्माण होत असल्याचे सांगून खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात खतांचा तुटवडा असल्याचे भासवण्यासाठी अकारण दुकानाबाहेर रांगा लावण्याचे उद्योग केले जात आहेत. मात्र, शेतकर्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, निर्भयपणे पेरणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. शेतकरी, तरुण आणि महिला देश विकासित करण्यासाठी योगदान देत आहेत. पण, काही जणांना देशाचा होत असलेला विकास पचनी पडत नाही आणि ते देशाची प्रगती पाहून ते अस्वस्थ झाले आहेत.
खते कमी किंमतीत उपलब्ध
जागतिक स्तरावर युरियाच्या एका पिशवीची किंमत ३ हजार रुपयांपर्यंत आहे, तरीही भारतीय शेतकर्यांना ती ३०० रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळते. ही संपूर्ण आर्थिक जबाबदारी सरकारने स्वतःवर घेतली आहे, त्याचप्रमाणे, डाय-अमोनियम फॉस्फेट खताच्या एका पिशवीची जागतिक किंमत ५ हजार रुपयांच्या वर गेली असतानाही, भारतीय शेतकर्यांना ती १ हजार ३५० रुपयांत मिळत आहे.
Related
Articles
आणीबाणी लादणे ही एक चूक होती;इंदिरा गांधींनाही असेच वाटले असावे...
08 Nov 2026
रामायण भाग -१ चित्रपटाचा ५०० कोटींचा व्यवसाय
09 Nov 2026
कारवाईच्या धास्तीने दूध भेसळीला लगाम
10 Nov 2026
शमीने वेगवान गोलंदाजीच्या एका युगाला आकार दिला : बीसीसीआय
09 Nov 2026
अरुण लाल यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार
08 Nov 2026
दीपोत्सवाचा संदेश (अग्रलेख)
09 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)