E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
देश
भूतानमध्ये हिमनदीचा तलाव फुटला
Samruddhi Dhayagude
31 Oct 2026
आसाम, पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागांना पुराचा इशारा
कोलकाता : भूतानमधील हिमनदीचा तलाव फुटला आहे. त्यामुळे उत्तर पश्चिम बंगालमध्ये पुराचे संकट कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. संकोशी नदी आणि उपनद्यांमध्ये पाणी वाहण्याचा धोका निर्माण झाल्याने परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची गरज निर्माण झाली असल्याचे अधिकार्यांनी शुक्रवारी सांगितले.
अलीपूरदूर जिल्ह्यातील नदी काठच्या गावातील रहिवाशांनी परिसर सोडावा, असे आवाहन प्रशासनाने केले होते. यानंतर ते पशुधनासह परिसर सोडत असल्याचे चित्र काल दिसले. जलस्रोत तपास आण विकास मंत्री नितीन प्रामाणिक यांनी सांगितले की, भूतानच्या लेमथांग येथील हिमनदी फुटली आहे. त्यामुळे तलावातील पाणी मो (मोफू) नदीतून वाहून संकोशी नदीत पसरत आहे. संकोशी नदीच्या जलसाठवणूक भागात आणि जोडलेल्या नद्यांच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी निघून जाण्यास सांगितले आहे. याबाबतची एक चित्रफित संदेशही त्यांनी प्रसारीत केला. नदीकाठच्या तुफानगंज आणि जवळच्या कूच बिहारमधील नागरिकांनी पुराचे संकट पाहता दक्षता घ्यावी. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिक्रिया दलांना दक्षतेचा इशारा दिला आहे. दार्जिलिंगचे खासदार राजू बिस्ट यांनी नागरिकांना आवाहन केले की, त्यांनी टेकडी, तराई आणि डोअरस परिसरात काळजी घ्यावी. भूतानच्या शिंतापू तलावातील सुमारे ७४ लाख घन मीटर पाणी मो नदीत आले आहे. त्यामुळे पाण्याची पातळी कमालीची वाढली आहे. ते पाणी पश्चिम बंगाल आणि आसमाच्या सीमावर्ती भागात वेगाने येत आहे.
Related
Articles
आंबट-गोड बोरांचा हंगाम सुरू
05 Nov 2026
कमांडर
09 Nov 2026
लाडोबा
08 Nov 2026
डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ल क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन
06 Nov 2026
रशियाचा युक्रेनवर हवाई हल्ला; ४० जणांचा मृत्यू
06 Nov 2026
मेहकरी प्रकल्पातील अनधिकृत उपशावर प्रशासनाचा बडगा
04 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित