E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
देश
हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
31 Oct 2026
उत्तराखंडमधील दुर्घटना
चमोली, (उत्तराखंड) : बद्रीनाथहून डेहराडूनला परतणारे हेलिकॉप्टर शुक्रवारी दुपारी जोशी मठाजवळील डोंगराळ भागात कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये वैमानिकासह सहा जण प्रवास करत होते. या सर्वांचा मृत्यू झाला असून, त्यांचे मृतदेह सापडले आहेत, अशी माहिती चमोलीचे पोलिस अधीक्षक सुरजित सिंग पनवार यांनी दिली.
कॅप्टन हिमांशू, प्रताप, अरुण, शंकर गौडा, सुधीर के. आणि एच. एस. नटराज अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व प्रवासी बंगळुरुचे रहिवासी होते. खराब हवामान आणि पावसामुळे ही दुर्घटना घडली, असेही ते म्हणाले.
हे हेलिकॉप्टर ’ट्रान्स भारत एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड’ या खासगी कंपनीचे असून, ते बद्रीनाथहून डेहराडूनला परतत असताना दुपारी २:२० च्या सुमारास चमोली जिल्ह्यातील जोशीमठ परिसरातील ’चई’ गावाजवळ डोंगराळ भागात कोसळले. हे हेलिकॉप्टर बद्रीनाथ धामवरून परतत होते का, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. मात्र, हेलिकॉप्टरमधील सर्व सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव आणि मदत कार्यासाठी पोलिस एसडीआरएफ, लष्कर आणि आयटीबीपीचे जवान रवाना झाले.दुपारी सव्वाच्या सुमारास बद्रीनाथहून डेहराडूनकडे निघालेले हेलिकॉप्टर सव्वादोनच्या सुमारास बेपत्ता झाले होते. जोशीमठजवळील दरीवरून उड्डाण करत असताना हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला, असे उत्तराखंड नागरी उड्डाण विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीक जैन यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून ’ट्रान्स भारत एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड’च्या सर्व हेलिकॉप्टर्सच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
या दुर्घटनेबद्दल पुष्कर सिंग धामी यांनी दुःख व्यक्त केले आहे. दरम्यान, २०१५ ते २०२५ या दहा वर्षांच्या कालावधीत ‘चार धाम’ क्षेत्रात अशा नऊ दुर्घटना घडल्या आहेत. मागील वर्षी दोन दुर्घटना घडल्या होत्या.
Related
Articles
लक्ष्मीपूजनासाठी व्यापारी सज्ज; दुकानांमध्ये विद्युत रोषणाईचा झगमगाट!
08 Nov 2026
स्वच्छ विनोदाचा बादशहा
08 Nov 2026
शेवगाव तालुक्यात ३५ गावांना २८ टँकरद्वारे पाणीपुरवठा
05 Nov 2026
शेतकर्यांनी हक्कासाठी रस्त्यावर उतरावे : राजू शेट्टी
09 Nov 2026
भारत-पोलंडचा द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट
05 Nov 2026
सोमवती यात्रेनिमित्त खंडोबाचे दुपारी बारा वाजता कर्हा स्नान
07 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)