E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
गुन्हेगारी जगत
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य अभियंत्याला लाच प्रकरणात अटक
Wrutuja pandharpure
30 Oct 2026
पिंपरी : पाणीपुरवठ्याशी संबंधित तीन निविदांच्या करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यासाठी 45 हजार 785 रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अटक केली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेत खळबळ उडाली आहे.
प्रमोद सुधाकर ओंबासे (वय 57, रा. निगडी प्राधिकरण) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी 57 वर्षांच्या तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा आणि नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी महापालिकेने काढलेल्या पाच निविदामध्ये पात्र ठरले आहेत. या पाचही कामांचे आदेश घेण्यासाठी तक्रारदाराने पिंपरी-चिंचवड महापालिकेशी करारनामा करणे बंधनकारक आहे. हे करारनामे तयार करून तक्रारदार यांनी पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अजय सूर्यवंशी आणि मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांची स्वाक्षरी घेण्यासाठी सादर केले होते. सूर्यवंशी यांनी करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यासाठी निविदा रकमेच्या 0.5 टक्क्याप्रमाणे 45 हजार 785 रूपयांची लाच मागितली होती. त्यावर तक्रारदार यांनी काम झाल्यावर नंतर बघू, असे सांगितले. सूर्यवंशी यांनी पाचपैकी तीन निविदांच्या करारनाम्यावर स्वाक्षरी करून तीनही फाईल अंतिम स्वाक्षरीसाठी मुख्य अभियंता ओंबासे यांच्याकडे पाठविली होती.
त्यावर ओंबासे यांनी बरेच दिवस स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी ओंबासे यांची भेट घेऊन करारनाम्यावर स्वाक्षरी करण्याची विनंती केली. त्यावर ओंबासे यांनी 45 हजार 785 रूपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पडताळणीत ओंबासे यांनी तक्रारदार यांच्याकडे लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. तसेच, ओंबासे यांनी तक्रारदार यांच्याकडून यापूर्वीही लाच घेतल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीत येऊन ओंबासे यांना अटक केली.
Related
Articles
‘एक देश, एक निवडणुकी’वरून काँग्रेस पुन्हा आक्रमक
05 Nov 2026
प्लास्टिक झाडूंमुळे पारंपरिक केरसुणी व्यवसाय अडचणीत
05 Nov 2026
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोला चांगला प्रतिसाद
07 Nov 2026
खुशबूचे ज्युदोमध्ये पदक निश्चित ; धिनिधीची अंतिम फेरीत धडक
03 Nov 2026
शनिवारवाडा 38 हजार 233 पणत्यांच्या तेजाने उजळला
09 Nov 2026
ग्रामीण महिलांच्या रोजगारातील वाढ हे आर्थिक संकटाचे लक्षण
09 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित