E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
लाइफस्टाइल
अंटार्क्टिकातील बर्फ घटल्याने समुद्राचे पाणी अधिक खारट
Samruddhi Dhayagude
30 Oct 2026
बंगळुरू : अंटार्क्टिकातील समुद्री बर्फाचे प्रमाण २०१५ नंतर मोठ्या प्रमाणात घटल्याने दक्षिण महासागरातील पाण्याच्या गुणधर्मांमध्ये बदल झाल्याचे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. नेचर क्लायमेट चेंज या विज्ञानविषयक नियतकालिकात प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, महासागराच्या मोठ्या भागात अनेक दशकांपासून दिसणारा गोड्या पाण्याचा कल उलटला असून, पाणी अधिक खारट आणि घन होत आहे. या बदलामुळे महासागरातील नैसर्गिक प्रक्रियांवर परिणाम होऊन जागतिक तपमानवाढीचा वेग वाढण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.
भारतीय विज्ञान संस्था, मेलबर्न विद्यापीठ आणि साउथॅम्प्टन विद्यापीठातील संशोधकांनी संयुक्तपणे हा अभ्यास केला. त्यामध्ये ‘अंटार्क्टिक इंटरमीडिएट वॉटर’ या मध्यम खोलीवरील पाण्यात झालेल्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. हे पाणी दक्षिण महासागरात तयार होते आणि समुद्राच्या पृष्ठभागापासून शेकडो मीटर खाली वाहत उत्तर दिशेने अटलांटिक, हिंदी आणि पॅसिफिक महासागरांपर्यंत पोहोचते. त्यामुळे अंटार्क्टिकाजवळील बदलांचा परिणाम दूरवरच्या महासागरीय क्षेत्रांमध्येही जाणवू शकतो.
भारतीय विज्ञान संस्थेच्या सेंटर फॉर अॅटमॉस्फेरिक अँड ओशन सायन्सेसमधील संशोधन विद्यार्थी आणि अभ्यासाचे प्रमुख लेखक कौशिक मिश्रा यांनी या बदलांचे परिणाम ध्रुवीय प्रदेशांपुरते मर्यादित न राहता दूरवर जाणवू शकतात.
अंटार्क्टिकातील समुद्री बर्फ आणि गोड्या पाण्याचे चक्र महासागराच्या पाण्याच्या रचनेवर परिणाम करते. हिवाळ्यात समुद्री बर्फ तयार होतो, तर तपमान वाढल्यावर तो वितळून गोडे पाणी समुद्रात मिसळते. त्यामुळे समुद्राच्या पृष्ठभागाजवळ थंड आणि तुलनेने कमी खारट पाण्याचा थर तयार होतो. मात्र, २०१५ नंतर समुद्री बर्फाचे प्रमाण घटू लागल्याने समुद्रात मिसळणार्या गोड्या पाण्याचे प्रमाण कमी झाले. त्याचवेळी समुद्राच्या खोल भागातून उबदार आणि अधिक खारट पाणी वर येण्याचे प्रमाण वाढले.
या संशोधनातून ध्रुवीय प्रदेशातील बर्फातील बदलांचा परिणाम जागतिक महासागरीय प्रक्रियांवर होऊ शकतो, हे अधोरेखित झाले आहे. समुद्री बर्फाचे प्रमाण, महासागरातील पाण्याची रचना आणि कार्बन साठवण्याची क्षमता यांतील परस्परसंबंधांचा अभ्यास हवामान बदलांचे परिणाम समजून घेण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
खोल समुद्रातील कार्बन वातावरणात मिसळण्याची शक्यता
महासागरात पाण्याचे वेगवेगळे थर त्यांच्या तपमान, क्षारता आणि घनतेनुसार तयार होतात. या थरांच्या रचनेत बदल झाल्यास महासागरातील पाण्याचे अभिसरण आणि विविध खोलीवरील पाण्याची देवाणघेवाण प्रभावित होऊ शकते. संशोधकांच्या मते, या बदलांमुळे खोल समुद्रात साठवलेला कार्बन अधिक सहजपणे वातावरणात पोहोचण्याची शक्यता आहे. असे झाल्यास वातावरणातील कार्बनचे प्रमाण वाढून जागतिक तपमानवाढीला आणखी गती मिळू शकते.
Related
Articles
गोकुळ ब्रँड ‘अमुल’च्या घशात घालण्याचा महायुतीचा कुटील डाव
06 Nov 2026
सीएटलच्या दिवाळी उत्सवात रुढीवादी गटाचा गोंधळ
09 Nov 2026
मॉलच्या झगमगाटात गावच्या बाजारपेठा हरवल्या
05 Nov 2026
लडाखमध्ये १३ हजार फुटांवर उतरले ‘आयएल-७६’ विमान
09 Nov 2026
बॅडमिंटनपटू तन्वीला रौप्यपदक
07 Nov 2026
महमद शमी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त
08 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित