E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
विदेश
रेल्वे अपघातानंतर स्पेनमध्ये हिंसाचार
Samruddhi Dhayagude
30 Oct 2026
पोलिसांवर फेकले फटाके; परिवहन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
माद्रिद : स्पेनमध्ये दोन हायस्पीड रेल्वेगाड्यांच्या धडकेत ६८ जणांचा मृत्यू झाल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. या दुर्घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी राजधानी माद्रिदमध्ये शेकडो नागरिकांनी सरकारविरोधात आंदोलन केले. आंदोलकांनी परिवहन मंत्री ऑस्कर पुएंते यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी पोलिसांवर बाटल्या आणि फटाके फेकल्याने तणाव निर्माण झाला. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.
रेल्वे दुर्घटनेची जबाबदारी घेण्याची मागणी आंदोलकांनी केली. परिवहन मंत्री ऑस्कर पुएंते यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. काही आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने बाटल्या आणि फटाके फेकले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली.
दरम्यान, सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे दोन हायस्पीड रेल्वेगाड्या एकमेकांना धडकल्या. या दुर्घटनेत ६८ जणांचा मृत्यू झाला. अपघाताचे नेमके कारण आणि सुरक्षेतील संभाव्य त्रुटी यांचा तपास केला जाणार आहे. दुर्घटनेनंतर मदत आणि बचाव पथकांनी रात्रभर घटनास्थळी शोधमोहीम राबवली.
नुकसानग्रस्त रेल्वेगाड्यांच्या ढिगार्यात अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यात आला. मृतदेह बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. बचावकर्मी घटनास्थळी सातत्याने काम करत होते.
Related
Articles
वैभव सुर्यवंशीकडे बिहारचे कर्णधारपद
08 Nov 2026
किरकोळ वादातून मुलाकडून वडिलांचा खून
08 Nov 2026
कॅब चालकाकडून हत्या; सातही मृतदेह हाती
09 Nov 2026
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे
05 Nov 2026
विशेष मुलांच्या दिवाळी साहित्य प्रदर्शनाला प्रतिसाद
05 Nov 2026
पटेल, तटकरे यांना विलीनीकरणाची आस
07 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)