पाकिस्तानात ऑक्सिजन सिलिंडरच्या स्फोटात दहा ठार   

कराची : पाकिस्तानच्या सिंध प्रांतात गुरुवारी एका रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात एका महिलेसह १० जण ठार झाले, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिली.
 
ही घटना थारपारकर जिल्ह्यातील नगरपारकर भागात घडली. एका महिलेला प्रसूतीसाठी दानो धंधाल येथील प्राथमिक आरोग्य दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रसूतीनंतर उद्भवलेल्या गुंतागुंतीमुळे त्या महिलेला मिथी शहरातील जिल्हा रुग्णालयात हलवले जात होते. रुग्णवाहिकेचा चालक सिलिंडर बाजूला करत असताना अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत महिला रुग्णासह १० जणांचा मृत्यू झाला. यात मृत महिलेच्या नातेवाईकांचा समावेश आहे, असे थारपारकरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आरिफ अझीझ जाफरी यांनी सांगितले. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

Related Articles