E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
विदेश
इस्रायलच्या निवडणुकीत परकीय हस्तक्षेपाच्या आरोपांची चौकशी
Samruddhi Dhayagude
30 Oct 2026
कतार आणि तुर्कीयेकडून निधी आल्याचा लिकुड पक्षाचा संशय
जेरूसलेम : इस्रायलमधील संसदीय निवडणुकीत परकीय हस्तक्षेप झाल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने देशाची अंतर्गत सुरक्षा संस्था ‘शिन बेट’ला दिले आहेत. कतार आणि तुर्कीयेकडून इस्रायल तसेच वेस्ट बँक परिसरात निधी पाठवून अरब मतदारांना आर्थिक मदत केल्याचा संशय पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षाने व्यक्त केला आहे.
सामान्य मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाली असून, विशेष मतदारांच्या दुहेरी पाकिटांमधील मतांची मोजणी अद्याप बाकी आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, नेतन्याहू यांच्या युतीला ५३, तर विरोधी युतीला ४८ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अरब पक्षांना एकूण १९ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी आवश्यक संसदीय बहुमताचा प्रश्न अद्याप अनिर्णित आहे.
इस्रायलच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचे आणि अरब मतदारांना प्रभावित करण्यासाठी निधी पुरवल्याचे आरोप कतारने फेटाळून लावले आहेत. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजेद अल-अन्सारी यांनी हे आरोप हास्यास्पद आणि धोकादायक असल्याचे म्हटले. इस्रायलमधील काही नेते स्वतःच्या राजकीय अपयशासाठी कतारला जबाबदार धरत असल्याचा आरोपही त्यांनी केला. समाजमाध्यमांवर चुकीची माहिती पसरवून कतारला इस्रायलच्या अंतर्गत राजकीय वादात ओढले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे आरोप निवडणूक आयोगाने निराधार ठरवले आहेत. आयोगाचे कार्यवाह महासंचालक डीन लिवने यांनी निवडणूक कायद्यानुसार पार पडल्याचे सांगितले. आतापर्यंत कोणत्याही गैरप्रकाराचा पुरावा आढळलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आयोगाचे अध्यक्ष नोआम सोहलबर्ग यांनी काही गोपनीय गुप्तचर माहितीच्या आधारे शिन बेटकडे चौकशीची विनंती केली आहे. मात्र, संबंधित माहितीची अद्याप पडताळणी झाली नसल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले.
अरब समुदायाला बदनाम करू नका : हर्झोग
इस्रायलचे अध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी परकीय हस्तक्षेपाच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र, या आरोपांच्या आधारे संपूर्ण अरब समुदायाला दोषी ठरवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. निवडणुकीत गैरप्रकार करणार्यांवर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे; त्याचवेळी मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाला असल्याचे हर्झोग यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीतून काय निष्पन्न होते आणि त्याचा सरकार स्थापनेच्या प्रक्रियेवर काय परिणाम होतो, याकडे इस्रायलमधील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Related
Articles
’कीर्तन’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण
04 Nov 2026
डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ल क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन
06 Nov 2026
परदेशी गुंतवणूकदारांचे पुनरागमन
09 Nov 2026
एमबीबीएस, बीडीएसच्या 138 रिक्त जागांसाठी विशेष प्रवेश फेरी
05 Nov 2026
संवत्सर संपेपर्यंत लक्ष्मीची ’पूजा अर्चा’ करा
09 Nov 2026
‘द पुणे फाऊंटन पेन शो’तर्फे हस्ताक्षर स्पर्धेचे परितोषिक वितरण
07 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित