E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
मनोरंजन
तेरावा गोवा लघुपट महोत्सव
Wrutuja pandharpure
30 Oct 2026
'कुस' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी लघुपट
पुणे
: तेराव्या गोवा लघुपट महोत्सवात महाराष्ट्रातील ऊस कामगारांचे विदारक वास्तव दाखवणारा 'कुस' हा लघुपट सर्वोत्कृष्ट मराठी लघुपट ठरला, तर शहरी जीवनातील बदलते स्वरूप सर्जनशील स्वरूपात मांडणारा 'द ट्रॅप' या लघुपटासाठी रामकुमार शेडगे यांना प्रायोगिक विभागातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. अक्षय व्यवहारे दिग्दर्शित 'मिटर डाऊन' हा लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला, तर तिसऱ्या या लघुपटासाठी श्रेयस लाड यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले . 'पंकी' या लघुपटासाठी राहुल राठोड यांना सर्वोत्कृष्ट पटकथा लेखक म्हणून गौरविण्यात आले.मराठी चित्रपट परिवार संस्थेतर्फे पुण्यातील बाळासाहेब ठाकरे व्यंग्यचित्र कलादालन सभागृहामध्ये या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ समीक्षक सुभाषचंद्र जाधव, लेखक मनोहर सप्रे, विनायक कुलकर्णी, यांच्यासह छायाचित्रकार आनंद चैनी यांच्या हस्ते महोत्सवाचे पारितोषिक वितरण करण्यात आले. महोत्सवाचे संचालक योगेश बारस्कर यावेळी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय विभागामध्ये जेम्स उगस दिग्दर्शित द नमो फुगे लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला तर डिस्टन्स वॉटर्स या लघुपटासाठी स्टील ब्युटी यांना सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले आणि द लास्ट डेट या लघुपटासाठी रासकी निवरा यांना सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पटकथा लेखक म्हणून पारितोषिक मिळाले. भारतीय विभागामध्ये माय बिलवड मुक्कू हा लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला तर भारत पाटील यांना अनुबौंड साऊंड या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट भारतीय दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले. योगायोग या लघुपटासाठी हर्षल अल्पे यांना सर्वोत्कृष्ट मराठी दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले . कुस या लघुपटासाठी ज्ञानेश्वर जाधवर यांना सर्वोत्कृष्ट मराठी पटकथा लेखक म्हणून पारितोषिक देण्यात आले. निर्वात या लघुपटाला सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण निर्मिती म्हणून पारितोषिक देण्यात आले. माहितीपट विभागामध्ये व्हाइट गोल्ड हा माहितीपट सर्वोत्कृष्ट ठरला, तर मुंबई वारली या लघुपटासाठी निनाद भटकर यांना सर्वोत्कृष्ट माहितीपट दिग्दर्शक म्हणून पारितोषिक देण्यात आले . अभिनय क्षेत्रामध्ये मुकेश जाधव यांना तिसऱ्या या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता , तर अंजली कसबे यांना पंकी या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि मे खेलुंगा या लघुकथासाठी रेयान आझाद याला सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरविण्यात आले
Related
Articles
सिंहगड संस्थेच्या चार शाळांची मान्यता रद्द
09 Nov 2026
व्हॉट्सऍप कट्टा
05 Nov 2026
गोकुळसाठी व्याकुळ, कायदाच बदलला!
10 Nov 2026
सत्तेत बसून मोर्चे काढणार्या भाजप सरकारचा दुटप्पीपणा हास्यास्पद
06 Nov 2026
लक्ष्मीपूजनाच्या साहित्याने बाजारपेठ सजली
08 Nov 2026
पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी टँकरची व्यवस्था रात्रीही
09 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)