आझम खान पिता-पुत्रांना जामीन   

प्रयागराज : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी दोन पॅन कार्ड प्रकरणात जामीन मंजूर केला. मात्र, शिक्षेला नकार देण्यास न्यायालयाने नकार दिला.
 
आझम पिता-पुत्रांना लोकप्रतिनिधींसाठी असलेल्या विशेष न्यायालयाने दुहेरी पॅन कार्ड प्रकरणात दोषी ठरवत सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर, खान पिता-पुत्राच्या शिक्षेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज भाजप आमदार आकाश सक्सेना यांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात केला होता. त्यानंतर, न्यायालयाने आझम यांची सात वर्षांची शिक्षा तीन वर्षांनी वाढवून दहा वर्षांची केली होती. तर, आझम यांचे पुत्र अब्दुल्ला यांची सात वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. 
 

Related Articles