E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
देश
‘मत चोरी’ विरोधातील आंदोलन सुरूच राहणार : खर्गे
Samruddhi Dhayagude
30 Oct 2026
नवी दिल्ली : ‘मत चोरी’ विरोधातील आंदोलने देशभर सुरुच राहतील, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी सांगितले. तसेच, संसद विसर्जित करुन मतपत्रिकेद्वारे सार्वत्रिक निवडणुकीस सामोरे जावे, असे आव्हान खर्गे यांनी भाजपला दिले.
काँग्रेसने १ नोव्हेंबर रोजी राजधानी दिल्लीत मत चोरीच्या विरोधात मेळाव्याचे आयोजन केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात आल्या होत्या. यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतपत्रिकेवर निवडणुका झाल्या; काँग्रेसने किती जागा जिंकल्या’ असा खोचक सवाल करत विरोधकांना फटकारले होते. त्यावर, खर्गे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
भाजपला स्वतःच्या कामगिरीवर इतकाच विश्वास असेल, तर त्यांनी संसद विसर्जित करावी आणि मतपत्रिकेवर सार्वत्रिक निवडणुकीस सामोरे जावे, असे आवाहन खर्गे यांनी दिले.
‘मत चोरी‘ आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलने सुरुच राहतील, असेही खर्गे यांनी स्पष्ट केले. १ नोव्हेंबर रोजी राजधानी दिल्लीत मेळाव्याचे आयोजन केले आहे. अनेक पक्षांनी यास पाठिंबा दिला आहे, असेही ते म्हणाले. या मेळाव्यात कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) सहभागी होणार का? असा सवाल केला असता खर्गे यांनी नकारार्थी उत्तर दिले.
Related
Articles
शेवगाव तालुक्यात ३५ गावांना २८ टँकरद्वारे पाणीपुरवठा
05 Nov 2026
विना परवाना वाहनांचा आळेफाटा परिसरात सुळसुळाट
06 Nov 2026
पंतप्रधानांकडून फडणवीस यांचे कौतुक
09 Nov 2026
दिल्लीत पाच वर्षांतील सर्वांत जास्त प्रदूषित दिवाळी
11 Nov 2026
घरकाम करणार्या महिलांनी घेतली पाणी वाचवण्याची शपथ
05 Nov 2026
डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ल क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन
06 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)