E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
देश
पश्चिम आशियातील संघर्षात २२ भारतीयांचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
30 Oct 2026
नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत २२ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये १४ नाविकांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
जयस्वाल म्हणाले, आखाती देशांतील भारतीय नागरिक आणि समुद्रावर कार्यरत असलेल्या नाविकांच्या सुरक्षेसाठी भारताची राजनैतिक मिशन संबंधित यंत्रणांच्या संपर्कात आहेत. भारतीय कामगार आणि नाविकांची सुरक्षा आणि सुरक्षितता यासाठी पश्चिम आशियातील भारतीय राजनैतिक कार्यालये परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, सौदी अरेबियातील विमानसेवांमध्ये झालेल्या व्यत्ययामुळे प्रभावित भारतीय नागरिकांसाठी, विशेषतः उमराह यात्रेकरूंसाठी जेद्दा येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने नव्या प्रवासविषयक सूचना जारी केल्या आहेत. भारतात परतण्यासाठी उपलब्ध अतिरिक्त विमानसेवांची माहितीही देण्यात आली आहे.
वाणिज्य दूतावासाच्या माहितीनुसार, जेद्दा आणि मदिना येथून सौदी एअरलाइन्ससह अन्य आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांची भारतासाठी उड्डाणे सुरू आहेत. तसेच, दम्माम आणि रियाध येथून फ्लायनासने लखनऊ, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, कोझिकोड आणि कोची या शहरांसाठी अतिरिक्त विमानसेवा जाहीर केल्या आहेत.
Related
Articles
पंतप्रधानांकडून फडणवीस यांचे कौतुक
09 Nov 2026
आंदोलनावरील निर्बंधांविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक
03 Nov 2026
मोहिते-पाटलांची टक्कर कायम
09 Nov 2026
जायकवाडीच्या रब्बी व उन्हाळी आवर्तनाचे वेळापत्रक निश्चित; शेतकर्यांना दिलासा
06 Nov 2026
कल्याणीनगरमधील वाहतूक कोंडी सोडविणार
08 Nov 2026
श्वानाची मुलावर झडप; मुलगा जखमी
06 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित